Sangli Drought News : पाणी द्या , अन्यथा कर्नाटकात जाणार.. ; जतमध्ये दुष्काळग्रस्तांचे उपोषण सुरु..

जत तालुक्यातल्या ६५ गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे.
Sangli news update
Sangli news updateSarkarnama
Published on
Updated on

Sangli : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. यंदा जुलै महिना संपत आला तरी पाऊसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे यावर्षी तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे.

Sangli news update
Madhukarrao Kamble Passed Away : मातंग समाजाचे नेते, माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे यांचे निधन

"आम्हाला पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जायला परवानगी द्या," अशी मागणी दुष्काळग्रस्तांनी केली आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास पन्नासहूनअधिक गावांनी संख येथे चक्री उपोषण सुरू केले आहे.

पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या जवळपास शंभर टक्के वाया गेल्या आहेत. तर पाण्याची टँकरची मागणी आता गावागावातून वाढू लागली आहे. मात्र प्रशासनाकडून राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. जत तालुक्यातल्या ६५ गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे.

Sangli news update
Villagers Protest Against Abhimanyu Pawar : आमदार अभिमन्यू पवारांच्या विरोधात ग्रामस्थांचा 'एल्गार' ; पुतळा जाळला..

राज्य सरकारकडून जर पाणी देता येत नसेल,दुष्काळ जाहीर करता येत नसेल,तर आता आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी पुन्हा एकदा दुष्काळग्रस्तांनी मागणी केली आहे. कर्नाटक सरकारकडून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून जतच्या दुष्काळी ६५ गावांना पाणी तातडीने मिळू शकतं, मात्र या बाबतीत राज्य सरकार चाल-ढकल करीत आहे. याशिवाय विस्तारित म्हैशाळ योजनेला निधी मंजूर करून केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग करण्यात आल्याचा, आरोप देखील दुष्काळग्रस्तांनी केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com