Jayant Patil meet Eknath Shinde : जयंत पाटलांची मोठी खेळी! अपात्र नगराध्यक्षांना घेऊन थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

Jayant Patil latest political move in Maharashtra :vअपात्र नगराध्यक्षांना सोबत घेऊन जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागील राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jayant Patil meet Eknath Shinde : जयंत पाटलांची मोठी खेळी! अपात्र नगराध्यक्षांना घेऊन थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
Sarkarnama
Published on
Updated on

सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मालगुंडे आणि बंधू सुनील मालगुंडे यांच्या अपात्रेवरून आता माजी मंत्री आमदार जयंत पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. सांगली जिल्हाधिकारी घोष यांच्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीचा सिलसिला सुरू ठेवत सर्वोतोपरी तयारी न्याय मिळवण्याच्या दृष्टीने ठेवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जयंत पाटलांनी ईश्वरपूरच्या अपात्र नगराध्यक्षांसाठी सगळी ताकद पणाला लावली आहे.

गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट असल्याचे समाज माध्यमांमध्ये माहिती दिली

Jayant Patil meet Eknath Shinde : जयंत पाटलांची मोठी खेळी! अपात्र नगराध्यक्षांना घेऊन थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
Mahavitaran PRO Suspended : सोशल मीडियावरील व्हिडिओ महागात; खुलासा न केल्याने महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

माझ्या ईश्वरपूर मतदारसंघातील उरूण- ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे ७ हजार २०० मतांनी निवडून येत लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आहेत. नगराध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्यांनी उरूण ईश्वरपूर शहरातील अनेक विधायक कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष आंनदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचे कुठलेतरी जुने अतिक्रमणाचे प्रकरण पुढे करून त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक पद रद्द ठरवले आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. या भेटीदरम्यान आंनदराव मलगुंडे व सुनिल मलगुंडे उपस्थित होते.

Jayant Patil meet Eknath Shinde : जयंत पाटलांची मोठी खेळी! अपात्र नगराध्यक्षांना घेऊन थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
Rohini Khadse : पिते दूध डोळे मिटून जात मांजराची.. भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर रोहिणी खडसेंनी सुनावलं गाणं, म्हणे 'या चोराच्या उलट्या बोंबा'

दरम्यान उरण ईश्वरपूर आणि सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आमदार जयंत पाटील यांना घेण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सुरू आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा देखील आहे. तर जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा सुरु असल्याने या भेटीनंतर राजकीय खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com