Rohini Khadse : पिते दूध डोळे मिटून जात मांजराची.. भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर रोहिणी खडसेंनी सुनावलं गाणं, म्हणे 'या चोराच्या उलट्या बोंबा'

Rohini Khadse On Satish Mahana : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणावरुन राजकारण तापलेलं असताना आता भाजप आमदाराच्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
Rohini Khadse
Rohini Khadse Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणावरुन सध्या देशभरात राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.

अशातच आता भाजप आमदाराच्या एका वादग्रस्त वक्तव्याने नवा नाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी संबधित भाजप आमदाराचा समाचार घेतला आहे.

ज्यांनी खऱ्या श्रद्धेने दान नाही दिले, त्यांचेच दान चोरीला गेले आहे" असं म्हणत उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सतीश महाना यांनी रामभक्तांच्या भक्तीची खिल्ली उडविली आहे. आमचा पैसा चोरीला गेलेला नाही. आमचा पैसा‌ मंदिराच्या बांधकाम आणि विकास कामांसाठी वापरला गेला आहे. राम मंदिराचे भव्य स्वरूप हे त्याचे प्रमाण असल्याचे सतीश महाना यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजपचे आमदार सतीश महाना यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. रोहिणी खडसे यांनी एक्सवर (X) भाजप आमदाराच्या वक्तव्याच्या व्हिडीओसह एक पोस्ट केली आहे.

रोहिणी खडसे यांनी महाना यांचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, घरात अन्नाचा कण नसताना आपल्या पदराच्या गाठीशी बांधलेला रुपया, राम मंदिराच्या दानासाठी लोकांनी दिला आहे आणि हा कोण कुठला महाना त्यांची श्रद्धा खोटी ठरवतोय? प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील दानपेटीतून दान चोरी तुम्ही करायचे आणि मग भक्तांच्याच श्रद्धेवर शंका घ्यायची, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात अशी टीका त्यांनी केली.

पुढे त्या म्हणाल्या की, अशांसाठी फार समर्पक गाणं आहे.

पिते दूध डोळे मिटून जात मांजराची..

मनी चोरट्यांच्या का रे भीती चांदण्यांची !

अशा शब्दांत रोहिणी खडसेंनी टीका केली आहे.

कोण आहेत सतीश महाना?

सतीश महाना हे भाजपचे (bjp) जेष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते कानपूरमधील महाराजपूर मतदारसंघातून सलग ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी योगी आदित्यनाथ सरकारमध्ये औद्योगिक विकास मंत्री म्हणूनही काम केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com