Sangli Political News : भाजपने मराठी माणसाने तयार केलेले दोन पक्ष फोडले. महागाईचा भडका उडाला असताना सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे. आता नीतीचे व रामराज्य आणण्याची बुद्धी त्यांना मिळावी, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना नाव न घेता लगावला आहे.
रेठरे धरण (ता. वाळवा) येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित सभेत जयंत बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. रेठरे धरण येथील जलमिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळांच्या खोल्या, राजारामबापू पाटील वाचनालय व आनंदराव पाटील कुस्ती आखाड्याचे उद्घाटन झाले.
जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, "भारत देशात नक्की काय सुरू आहे, याचा प्रत्येक भारतीयाने विचार करायला हवा. महाराष्ट्र उभा करणाऱ्या दोन मराठी माणसांचे पक्ष भाजपने फोडले. पूर्वीच्या योजना आता नाव बदलून पुन्हा सुरू केल्या आहेत. सध्या देशाची राजकीय परिस्थिती पाहता अनेकजण पक्षांतर्गत ये-जा करत आहेत. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नवव्यांदा मुख्यमंत्री झालेले बिहारचे नितीश कुमार हे 'पलटूराम' आहेत, अशी टीका पाटलांनी केली.
जिल्ह्यामध्ये 500 जिल्हा परिषद शाळांची सुधारणा केली, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा उत्साह निर्माण व्हावा, यासाठी शाळांना जीवनदान देण्याचा प्रयत्न होतोय. मानसिंगराव नाईकांनी (Mansingrao Naik) यांच्यामुळे या योजनेला गती मिळाली आहे. मात्र आता सामान्य माणसाचे मूलभूत प्रश्न बाजूला झाले, असल्याची टीकाही आमदार पाटलांनी केली.
काहीजणांची पोस्टरबाजी
वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी या परिसरातल्या सर्व गावांना मिळाले पाहिजे, योजना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. काहीजण पोस्टरबाजी करत मीच कार्य केली आहेत, अशी वल्गना करत आहेत. चिकुर्डेला दोन कोटींचे पत्र पाठविले होते, तर मग पाच कोटी मंजूर कसे झाले ? नागरिकांना फसवू नका, असा टोला आमदार मानसिंगराव नाईकांनी भाजप नेते सत्यजित देशमुखांना नाव न घेता लगावला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.