MVA Congress-MNS Alliance : 'मनसे'ची महाविकास आघाडीत एन्ट्री निश्चित, काँग्रेसने दाखवला हिरवा कंदील; ठाकरे, पवारांचे शिलेदारही आग्रही!

NCPSP Shivsena UBT PMC Election : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
pune politics
pune politicsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. पुण्यामध्ये ही पहिलीच अधिकृत महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीमध्ये मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामावून घ्यायचं की नाही? हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. या बैठकीत मनसेबाबत प्राथमिक निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली आहे. या चर्चेत मनसेला महाविकास आघाडीत समावून घेण्याचा विषय केंद्रस्थानी होता. चर्चेदरम्यान सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांनी याबाबत आपली भूमिका मांडली.

पुण्यामध्ये मनसेला सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सकारात्मक असल्याचा पाहायला मिळत आहे. राज्यातील समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढण्याचे आदेश वरिष्ठांनी आम्हाला दिले असल्याचं शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या ठाकरेंच्या महाविकास आघाडी सोबतच मनसे सोबत ही जागा वाटपाच्या चर्चा सुरू केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मनसेबाबत कोणताही निर्णय घेतला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे युती ही निश्चित असल्याचं बोलले जात आहे. मनसेसोबत युतीच्या चर्चा करण्याच्या सूचना आल्या असल्याचे ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे आणि संजय मोरे यांनी सांगितले आहे.

pune politics
Tapovan Controversy : गिरीश महाजनांकडून तपोवन वादाचे 'डॅमेज कंट्रोल', नाशिकमध्ये 1 हजार झाडे लावायला सुरुवात

वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस नेते सकारात्मक दिसत नाही, मात्र, स्थानिक पातळीवर पुणे काँग्रेस मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यात सकारात्मक असल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, वरिष्ठांनी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी कोणासोबत करायची याबाबतचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. जे सत्तेमध्ये नसतील अशा सर्व पक्षांसोबत युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.

लवकरच घोषणा होणार...

महाविकास आघाडीच्या झालेल्या पहिल्याच बैठकीमध्ये मनसेला पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यास तिन्हीही पक्ष सकारात्मक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुण्यामध्ये तरी मनसे महाविकास आघाडीचा भाग असण्याची शक्यता आहे.लवकरच या बाबात अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे.

pune politics
Modi Government News : मोठी बातमी : मोदी सरकार ‘मनरेगा’ करणार रद्द; नवा कायदा आणणार, रोजगाराचे दिवस वाढणार की कमी होणार? 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com