
थोडक्यात बातमी
जयंत पाटील यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी म्हटलं की, माझ्याविरोधात अनेक कुरघोड्या झाल्या, पण मी पक्ष सोडत नाही, फक्त एक पाऊल मागे घेतलं आहे.
शरद पवार यांच्याशी निष्ठा कायम ठेवत त्यांनी पक्षाच्या कामातून फक्त पद सोडल्याचं स्पष्ट केलं आहे.
Sangli News : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तर शरद पवार यांनी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची केली आहे. तर काही दिवसांपूर्वी जाहीर भाषणात जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी समोर येऊन याचे स्पष्टीकरण दिले होते. पण आज त्यांनी अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
जयंत पाटील यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना महायुती सरकारवर टीका केलीय. त्यांनी, महाराष्ट्र आता उत्तरेतील एखाद्या राज्याचा सारखा झाला आहे. तीन भाषा सुत्र लादण्यादा प्रयत्न झाला हे का झाले तर तिकडच्या राज्यकर्त्यांना खूश करण्यासाठी हे झाल्याचा टोला लगावला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवर देखील भाष्य करताना, राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पण सरकार काही नुकसान भरपाई द्यायला तयार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी जयंत पाटील यांनी, माझ्या खाद्यांवर झेंडा येईल असे वाटले नव्हते. पण तसे झाले. मला पक्षाचे अध्यक्षपद सात वर्ष सांभाळता आले. या सात वर्षांत अनेकांनी मला साथ दिली. पक्ष फुटलेला होता. मेहबूब शेख सारखा पोरगा तरूणाचे प्रतिनिधीत्व करतो. सक्षणाला युवतीची अध्यक्ष झाली. सुनिल गव्हाण विद्यार्थ्यांचा प्रमुख झाला. रूपाली चाकणकर त्यावेळी महिला अध्यक्ष झाल्या. सामान्य घरातील मुलांना साहेबांनी पदं दिली. आरआर पाटील (आबा) यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. तेच चित्र पुढे ठेऊन आज या सगळ्यांच्या नेमणुका झाल्या.
सगळ्या राज्यात जागर निर्माण करण्याचे काम दोन अमोलांनी केले. एक अमोल कोल्हे आणि दुसरे अमोल मिटकरी. पण आज एक इकडे आहे दुसरे तिकडे गेलेत. माझी कोणती संघटना नाही की माझे दुसरे कुठले फाऊंडेशन. माझी राष्ट्रवादी हीच संघटना असून हेच फाऊंडेशन आहे. त्याचेच फळ मला मिळाले असून मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो. गेली 25 वर्ष मी काम करत आहे. 2633 दिवस मी प्रदेशाध्यक्ष राहिलो. इतरांची 2 ते 3 वर्षांची टर्म असते. मात्र साहेबांनी मला वारंवार संधी दिल्याचे जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार साहेबांनी मला सांगितले, तूच अध्यक्ष व्हायला हवं. आता बरीच वर्ष झाली मीच अध्यक्ष आहे. आता मला बाजूला व्हायला पाहिजे याची जाणीव झाली आणि मी बाजूला झालो. मी कमी बोलतो. त्यामुळे लोकांना वाटतं मी. पण माझ्या विरोधात अनेक कुरघोड्या झाल्या. प्रत्येक गोष्टीत प्रसार माध्यमांबरोबर बोललेच पाहीजे असे मला वाटत नाही. माझे सगळे सहकारी गेले आणि मीच फक्त साहेबांबरोबर राहिल्याचेही त्यांनी सांगिलतं.
दरम्यान जयंत पाटील यांनी, मी बायकोला परवा म्हणालो की गेल्या सात वर्षात आपण सुट्टी काढली नाही. मात्र या सात वर्षात ज्यांनी साथ दिली, त्यांचे आभार तर आता जे कोणी नवे अध्यक्ष होतील त्यांना शुभेच्छा देतो. आपला पक्ष सर्व समावेश आहे. ओबीसी घटकाला आपल्या पक्षाशी जोडण्याचे काम केले पाहीजे. जातीय संघटनांमध्ये कमी रहा. पक्षाचा विचार पुढे ठेवा. मला विश्वास आहे आपण नक्की यश्वस्वी होऊ, असाही कानमंत्र दिला आहे.
आता होणारी नवी सुरूवात असून मी फक्त सेनापती होतो. माझी सेना अजून सज्ज आहे. मी जातोय पण पक्ष सोडत नाही. एक पाऊल मागे घेतले आहे बस्स असेही जयंत पाटील यांनी म्हटलं असून भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णपणे फटाळून लावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.