Jayant Patil Attack On Padalkar : जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; म्हणाले, ‘भुंकणारे भूंकतच राहतात, आपण आपल्या चालीनं’

Sangli Dcc Bank : टीका केली असेल तर ठीक आहे, त्याच्यावर मी काही बोलत नाही, त्याने मला काही फरक पडत नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी होईल ना. करू द्या ना. चौकशीला कोणी घाबरतंय की काय?
Jayant Patil- Gopichand Padalkar
Jayant Patil- Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Sangli, 08 March : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीकेची तोफ डागली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या चौकशीच्या मागणीच्या निमित्ताने पडळकरांनी जयंत पाटील यांची साखर कारखाने खरेदी काढत निशाणा साधला होता. त्यावर माजी मंत्री जयंत पाटील यांनी पलटवार करताना ‘एखाद्याने भुंकायचेच ठरवले असेल तर तो भुंकत राहतो. आपण आपल्या चालीने चालायचं असतं’ या शब्दांत हल्लाबोल केला आहे.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यात नेहमी कलगीतुरा रंगलेला असतो. पडळकरांकडून थेट नाव घेऊन पाटील यांच्यावर हल्ला चढवला जातो. मात्र, जयंत पाटील हे नाव न घेता शाब्दीक जोडे हाणण्यात पटाईत आहेत, त्यामुळे जयंतराव आपल्या शैलीने पडळकरांचा समाचार घेत असतात.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, टीका केली असेल तर ठीक आहे, त्याच्यावर मी काही बोलत नाही, त्याने मला काही फरक पडत नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी होईल ना. करू द्या ना. चौकशीला कोणी घाबरतंय की काय? असं उलट आव्हान जयंत पाटील यांनी दिले आहे.

Jayant Patil- Gopichand Padalkar
Satish Bhosale : ‘अण्णा मुख्यमंत्री व्हावेत...मग ते कोणत्याही पक्षातून!’; सुरेश धसांचा फरार कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईचा नवा व्हिडिओ व्हायरल

सांगली जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असं काही वाटत नाही. एखाद्याची बालबुद्धी असते, तो असं काही विचारत असतो. एखाद्यानं भुंकायचंच ठरवलं आणि तो भुंकतच राहिला तर त्याच्या भुंकण्याकडे बघितलंच पाहिजे, असं काही नाही. आपण आपल्या चालीने चालायचं असतं. भुंकणारे असे अनेक असतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला.

Jayant Patil- Gopichand Padalkar
Padalkar Vs Jayant Patil : पडळकरांचा जयंत पाटलांवर तिखट शब्दांत हल्ला; ‘जयंत पाटील हे सराईत दरोडेखोरासारखे, मागं पुरावाच ठेवत नाहीत’

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

जयंत पाटील हे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सर्वेसर्वा आहेत. जयंत पाटील हे सगळं करतात, पण आपला त्याच्याशी काही संबंध नाही, असं ते दाखवत असतात. जयंत पाटील हे एखाद्या सराईत दरोडेखोराला लाजवेल, असे दरोडेखोर आहेत. काही लोक आपल्याकडे चोऱ्या करायला येतात आणि मागं काही पुरावाच ठेवत नाहीत. जयंत पाटील त्यातील आहेत, मागं पुरावाच ठेवत नाहीत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com