
Beed, 08 March : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई मारहाण प्रकरणात फरारी आहे. मात्र, त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या नव्या व्हिडिओमध्ये खोक्याभाई हा ‘सुरेशअण्णा धस हे मुख्यमंत्री व्हावेत. मग ते कोणत्याही पक्षातून व्हावेत,’ अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहे, त्यामुळे खोक्याभाई हा आमदार धस यांची डोकेदुखी वाढविण्याची शक्यता आहे.
सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई हा भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा आष्टीतील कार्यकर्ता आहे. तो सध्या भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त सेलचा पदाधिकारी आहे. मात्र, त्याचे एकेक कारनामे पुढे येत असल्याने धस यांनाही त्यावर स्पष्टीकरण देत बसावे लागत आहे. अगोदरच मारहाणीच्या प्रकरणात फरारी असलेला खोक्याभाई हा आपल्या विधानामुळे दररोज पुढे येताना दिसत आहे. त्याचे ते व्हिडिओ जुनेच असली तरी नवे वाद निर्माण करणारे ठरत आहे.
नव्याने व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सतीश भोसले (Satish Bhosale) ऊर्फ खोक्याभाई म्हणतोय की, अण्णा आता आमदारच आहेत, भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री व्हावेत, अशीच आमची इच्छा आहे. मग ते कोणत्याही पक्षातून व्हावेत, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपण फक्त अण्णाप्रेमी असून अण्णाप्रेमीच राहणार. आज मी भारतीय जनता पक्षाच्या पदावर आहे. पण, उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले तरी माझा राजीनामा पहिला असणार आणि आपण अण्णासोबतच असणार, असेही तो स्पष्ट करतोय.
या व्हिडिओमुळे सतीश भोसले याच्या अडचणीत वाढ होत असतानाच सुरेश धस यांचीही डोकेदुखी वाढविण्याची शक्यता आहे. कारण, हरणाची शिकार करताना आडवे आले म्हणून त्याने ढाकणे पिता पुत्रांना बेदम मारहाण केल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात नोंदविण्यात आलेला आहे. तसेच, बॅटने एकाला अमानुषणे मारहाण करतानाचाही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
मारहाण प्रकरणात सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला भोसले हा फरारी आहे. तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. पण त्याच्या जुन्या व्हिडिओमुळे तो वारंवार समोर येताना दिसत आहे, त्यामुळे बीडमध्ये आता खोक्याभाईची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याने शिरूर परिसरातील वन्यजीवांची विशेषतः हरणांची तस्करी करून त्यातून माया गोळा केली असण्याची शक्यता स्थानिक बोलून दाखवत आहेत. त्या पैशातूनच त्याच्याकडे सोनं, अलिशान गाड्या आलेल्या असाव्यात, अशी शंका स्थानिक बोलून दाखवत आहेत. याशिवाय, खोक्याने हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा आरोपही त्याच्यावर स्थानिक करत आहेत. कारण हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही परिसरात सापडत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.
यापूर्वी सतीश भोसले आणि सुरेश धस यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात धस हे त्याला अगोदर ए खोक्या असे म्हणतात. त्यानंतर लगेच सॉरी बाबा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गडबडीत जमलं नाही, असे सांगून ते ‘वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा....’ असे म्हणतात. त्यावर खोक्या हा धन्यवाद असाचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या, अशी विनंती करतो. त्यावर सुरेश धस हे शंभर टक्के शंभर टक्के ९९ टक्केसुद्धा नाही, असं त्यात म्हणताना दिसत आहेत.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.