Jayashree patil : भाजपप्रवेशानंतर जयश्रीताई पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे पहिलीच मागणी : फडणवीसांचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Jayshree patil Demand fund for Vasantdada Patil Memorial : काँग्रेससह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्री पाटील यांनी नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Maharashtra CM Devendra Fadnavis And Jayashree Patil
Maharashtra CM Devendra Fadnavis And Jayashree Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : भाजप प्रवेशानंतर जयश्री पाटील यांनी पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजीमंत्री विनय कोरे उपस्थित होते. या भेटीत जयश्री पाटील यांनी केलेल्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Jayashree Patil meets Devendra Fadnavis demands completion of Vasantdada Patil Memorial project in Sangli)

राज्याचे तिसरे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सांगली येथील स्मारकाचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. ते काम तातडीने पूर्ण करावे अशी विनंती जयश्री पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. या महत्वाच्या मागणीसह इतर गोष्टींसाठी त्यांनी फडणवीस यांची मंगळवारी (ता.1) भेट घेतली होती.

यावेळी जयश्री पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाचे काम रखडलेले असून त्यासाठी 8 कोटी रुपयांची गरज आहे. शासनाकडून हा निधी मिळावा, अशी मागणी जयश्री पाटील यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी, स्मारकाच्या उर्वरित कामाच्या निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली असून जिल्हाधिकारी यांच्याकडून तातडीने प्रस्तावही मागवला आहे.

Maharashtra CM Devendra Fadnavis And Jayashree Patil
Jayashree Patil : भाजपचा मास्टरस्ट्रोक! एकाच नेत्याचा प्रवेश अन् काँग्रेसला घरघर?

याशिवाय यावेळी वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी स्मारक समितीत जयश्री पाटील यांचाही समावेश करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सुचवले आहे.

Maharashtra CM Devendra Fadnavis And Jayashree Patil
Jayashree Patil : जयश्रीताईंचा निर्णय झाला, चंद्रकांत पाटलांनी सूत्रं हलवली अन् फडणवीसांनी शब्दही दिला; आता बुधवारी भाजप प्रवेश

महापालिकेसाठी नूतन इमारत?

सांगली महापालिकेचे मुख्यालय हे तत्कालीन सांगली नगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीत आहे. ही इमारत अपुरी असल्याने 'मंगलधाम' प्रशासकीय इमारत, महापालिका शाळा नंबर एक समोरील प्रशासकीय इमारत, काळ्या खणीजवळील पाण्याच्या टाकीखालील इमारतीत विविध विभागांचा कारभार सुरू आहे.

हा सर्व कारभार एकाच छताखाली येण्यासाठी नवीन प्रशस्त इमारत गरजेची आहे. त्यामुळे महापालिकेसाठी नूतन इमारत मिळावी, अशीही मागणी जयश्री पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com