

Solapur, 09 January : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. भाजपने अनेक मातब्बरांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली तरी भाजपचे बेरजेचे राजकारण सुरूच आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांची भेट घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून लिंगायत समाजातील मातब्बर नेत्याची मदत महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जोडण्यास पालकमंत्र्यांना मोठे यश आल्याचे मानले जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची त्यांच्या गंगा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, यांच्या काडादी परिवारातील शरणराज आणि पुष्पराज काडादी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
काडादी यांच्यासोबत गोरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. विशेषतः तोंडावर असलेली सिद्धरामेश्वरांची यात्रेचे नियोजनबाबतही दोघांवर संवाद साधला. तसेच, येत्या १५ तारखेला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेही ओघानेच चर्चा आली. त्यात धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांनी गोरे यांना सोबत राहण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, धर्मराज काडादी हे लिंगायत समाजातील मोठे प्रस्थ आहे. समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच, काडादी यांच्या ताब्यात सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर कारखान्यासह अनेक संस्था आहेत. त्यामुळे काडादींच्या शब्दाला लिंगायत समाजात मान आहे, त्या पार्श्वभूमीवर काडादी यांनी गोरेंना सोबत राहण्याचा दिलेला शब्द महत्वाचा आहे.
काडादी यांच्या सोबत येण्याचा फायदा भाजपला सोलापूरबरोबरच लातूर आणि मराठवाड्यातील इतर शहरांतही होऊ शकतो. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही काडादी सोबत येण्याने भाजपला फायदा होऊ शकतो, त्यामुळे गोरे यांची स्ट्रॅटेजी भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.