Jaykumar Gore : प्रतिष्ठा पणाला लागलेल्या साताऱ्यात बाजी मारताच जयकुमार गोरेंचं पुन्हा ‘ते’ सेलिब्रेशन

Satara Zilla Parishad President Election : साताऱ्यात भाजपने नाट्यमय घडामोडीत विजय मिळवला. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सत्ता मिळवत जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केले आणि विजयाचा जल्लोष चर्चेत आला.
Jaykumar Gore
Jaykumar Gore Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 20 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अशक्यप्राय वाटणारा विजय अनेक नाट्यमय घडामोडीनंतर मिळविला. खरं तर सोलापूर जिल्ह्यातील महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये एकहाती वर्चस्व मिळविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिष्ठा स्वजिल्ह्यात पणाला लागली होती. मात्र, सर्व अस्त्रांचा वापर करत भाजपने जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळविले आणि त्यानंतर गोरेंचा जल्लोष करतानाचा तो फोटो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची तीन मतांच्या फिरकाने विजय झाला. शिंदे आणि भोसले यांना निवडणुकीत ३३ मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना प्रत्येकी ३० मतं मिळविता आली. त्यामुळे भाजपने मोठा गेम केल्याचे स्पष्ट झाले.

जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नगरपालिका, त्यानंतर महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दणदणीत यश मिळविले. विशेषतः महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांना नेस्तानबूत करून टाकले आहे, त्यामुळे गोरेंची कामगिरी सोलापूर जिल्ह्यात उल्लेखनीय ठरली आहे.

Jaykumar Gore
Satara ZP : एका फिर्यादीनं रातोरात सूत्रं फिरली; राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदानाला पोचण्यापूर्वीच पोलिसांनी उचललं

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी नोंद केल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री गोरे यांनी केलेल्या सेलिब्रेशनची विशेष चर्चा झाली होती. बंदुकीतून बार उडवून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचा संदेश त्यातून दिल्याचे मानले जात होते.

सोलापूर जिल्ह्यात भाजपने उल्लेखनीय यश मिळवून देणाऱ्या जयकुमार गोरे यांना स्वजिल्हा असलेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत गाठण्यास अपयश आले होते. त्यामुळे गोरेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Jaykumar Gore
Satara ZP : सातारा झेडपीत भाजपचा अध्यक्ष होताच गोरे म्हणाले, ‘निकालानंतर काहींना अहंम होता, आमची चेष्टा लावली होती...’

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता अखेर साताऱ्यात आली आणि त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपच्या इतर नेत्यांसोबत पुन्हा विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे सेलिब्रिशन पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com