Satara ZP : एका फिर्यादीनं रातोरात सूत्रं फिरली; राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदानाला पोचण्यापूर्वीच पोलिसांनी उचललं

Zilla Parishad President Election : साताऱ्यात पोलिस कारवाईमुळे राष्ट्रवादीचे सदस्य सभागृहात पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे भाजपला अनपेक्षित फायदा होऊन अध्यक्षपद मिळाले आणि निवडणुकीत नाट्यमय कलाटणी झाली.
Satara Zilla Parishad
Satara Zilla Parishad Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 20 March : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीवेळी सभागृहात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी महायुतीचेच चार मंत्री एकमेकांशी भिडल्याचे चित्र दिसून आले. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे यांच्या मुलाने दिलेल्या एका फिर्यादीमुळे रातोरात सूत्र फिरलं आणि पोलिसांनी राष्ट्रवादीच्या दोन सभागृहात पोचूच दिले नाही, त्याचा फायदा आपसूकच भाजपला आपला अध्यक्ष बसविण्यासाठी झाल्याचे दिसून येते.

सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले होते. सातारा शहर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे यांचा मुलगा विकास शिंदे यांनी एक फिर्याद दिली. त्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी १५ दिवसांपासून माझे वडील दिनकर शिंदे यांना कुठे घेऊन गेले आहेत, याची माहिती नव्हती.

ते १८ मार्चला महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील रेडबटन हॉटेलवर आल्याचे समजले. तेव्हा त्यांना भेटायला गेलो. परंतु, एकांतात मला वडिलांशी भेटून दिलं नाही. मी नजर चकुवून वडिलांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला येथे जबरदस्तीने डांबून ठेवल्याचे सांगितले. ही गोष्ट घरच्यांना सांगितल्यास जिवाचे बरे-वाईट करू, अशी धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे माझ्या वडिलांचा खून करण्याच्या उद्देशाने राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, भैय्या डोंगरे, संदीप ऊर्फ पिंटू मांडवे यांनी अपहरण करून डांबून ठेवले आहे, असे विकास शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

गेली ४० दिवस राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य बाहेर होते. दोन दिवसांपूर्वी सर्व सदस्यांना महाबळेश्वर येथे आणण्यात आले होते. या सदस्यांच्या देखभालीसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची टीम तैनात होती. रात्री उशिरा खासदार नितीन पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे देखील त्या हॉटेलवर पोहोचले होते.

Satara Zilla Parishad
Satara ZP : सातारा झेडपीत भाजपचा अध्यक्ष होताच गोरे म्हणाले, ‘निकालानंतर काहींना अहंम होता, आमची चेष्टा लावली होती...’

फिर्याद दाखल झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास पोलिसांच्या गाड्यांचा ताफा हॉटेल रेड बटन येथे पोहोचला. त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. मात्र, पोलिस ज्या व्यक्तीचा शोध घेत होते, ती व्यक्ती तेथे सापडली नाही. त्या वेळी अनिल देसाई व संदीप मांडवे तिथे उपस्थित होते. पण, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि सदस्य या फिर्यादीबाबत अनभिज्ञ होते.

काही वेळानंतर अपहरणाबाबत तक्रार दाखल झाल्याची माहिती राष्ट्रवादीला समजली. परंतु, ही तक्रार नेमकी कोणत्या पोलिस ठाण्यात दाखल आहे, माहिती सुरुवातीला त्यांना देण्यात आली नव्हती. त्यानंतर दिनकरबापू शिंदे स्वतः महाबळेश्वर पोलिस ठाण्यात हजर झाले. माझे कोणीही अपहरण केलेले नाही, मी सुरक्षित आहे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. तरीही पोलिसांनी त्यांची गांभिर्याने दखल घेतली नाही. त्यानंतर खासदार पाटील व बापू शिंदे यांनी वाई उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. तेथेही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

Satara Zilla Parishad
Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेतील फुटीर 5 सदस्यांची नावं उघड : राष्ट्रवादी अन् शिवसेनेला धक्का देत थेट भाजपला मतदान

विजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सकाळी सुमारे पावणे दहा वाजता गुन्हा नोंदवून अनिल देसाई व संदीप मांडवे यांना अटक केली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी सर्व सदस्य सातारा येथे पोहोचले. तेथे नाट्यमय घडामोडींनंतर सातारा पोलिसांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदानासाठी जाऊ न देता जिन्यातूनच ताब्यात घेतले. त्यांना महाबळेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. महाबळेश्वर येथे आणल्यानंतर त्यांना अटकेची कारणे सांगण्यात आली. अटकेनंतर दोघांना प्रथम रुग्णालयात दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले.

भाजपने प्रशासन व पोलिसांच्या मदतीने लोकशाहीचा गळा घोटला आहे. आम्हाला मतदान करू दिले नाही. बापू शिंदे यांनी स्वतः हजर होऊन जबाब दिला असतानाही आम्हाला अटक करण्यात आली. आमच्याशी अमानुषपणे वागण्यात आले. आमचे बहुमत असतानाही भाजपाने अध्यक्षपद हस्तगत केले, असा आरोप अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी केला. तसेच, या प्रकरणाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com