Nagpur NCP : बाबा गेले अन्‌ भाऊ आले; राष्ट्रवादी काँग्रेसला काय मिळणार अन्‌ फरक काय पडणार?

जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बदल केला. बाबा गुजर यांच्या राजीनाम्यानंतर राजाभाऊ टाकसाळे यांची नियुक्ती झाली असून महायुतीत जागावाटपावर चर्चा रंगली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on
  1. जिल्हाध्यक्ष बदल – नागपूर जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या राजीनाम्यानंतर राजाभाऊ टाकसाळे यांची नवी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

  2. स्थानिक राजकीय गुंतागुंत – शरद पवार गटातील अनिल देशमुख व रमेश बंग यांच्यासह काही माजी सदस्य पक्षात असले तरी जिल्ह्यात भाजपकडे कल वाढलेला आहे; अजित पवार गटाकडे येथे मोठी ताकद नाही.

  3. आव्हाने – नवे जिल्हाध्यक्ष टाकसाळे यांचा राजकारणातील अनुभव कमी असून महायुतीत भाजपसोबत जागा समन्वय साधणे आणि पक्षातील गटबाजी हाताळणे हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे.

Nagpur, 29 Septmber : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष बदलला. माजी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी आठवडाभरापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांच्याऐवजी राजाभाऊ टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाबा गेले आणि भाऊ आले तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महायुतीत किती जागा येणार, किती जागा जिंकणार, हा खरा प्रश्न आहे.

नागपूर जिल्ह्यातील दोन बडे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री रमेश बंग हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत आहेत. जिल्हा परिषद सदस्यसुद्धा त्यांच्याच सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) एकत्र असताना पक्षाचे आठ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. त्यात सलील देशमुख आणि योगेश बंग या दोघांचा समावेश होता. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्ज्वल बोढारे या भाजपात दाखल झाल्या आहेत.

काटोल-नरखेड आणि हिंगणा हे नागपूर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघच राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही मतदारसंघातून कोणीही अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले नाहीत, हे विशेष मानावे लागेल.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती सतीश शिंदे यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने अधांतरी झुलवत ठेवले आहे. ते अजितदादा यांच्यासोबत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही शिंदे कुटुंबीयांसोबत घरोब्याचे संबंध आहेत.

माजी सभापती सतीश शिंदे यांचे वडिल सुनील शिंदे हे दोन वेळा आमदार होते. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी सतीश शिंदे यांना फोन केला होता. त्यामुळे त्यांना देशमुख कुटुंबीयांच्या विरोधात उघडपणे प्रचार करता आला नाही. निवडणूक आटोपल्यानंतरही सतीश शिंदे यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आपला मानायला तयार नाही.

Ajit Pawar
Baramati Politic's : जावई अन्‌ लेकीला नाकारून पवारसाहेबांचा प्रचार केला; अजितदादांनी सांगितला बारामतीतील निवडणुकीचा किस्सा

राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक बंडखोरांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला आहे. मात्र, शिंदे यांच्या पक्षप्रवेशाला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी विरोध दर्शवला असल्याचे समजते. नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे मृदुभाषी आणि सर्वांसोबत जुळवून घेणारे आहेत. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात त्यांची पाटी कोरी आहे.

नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही. नवे जिल्हाध्यक्ष टाकसाळे यांचा स्वभावसुद्धा आक्रमक नाही. एकंदरीतच त्यांचे व्यक्तीमत्व बघता त्यांना महायुतीत भाजपच्या होकारात होकार मिळवावा लागणार आहे. हीच अडचण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांची होणार आहे.

Ajit Pawar
Maharashtra Flood : पूरग्रस्तांसाठी पांडुरंग धावला; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री सहायत्ता निधीस कोटीची देणगी
  1. प्र: नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष कोण आहेत?
    उ: राजाभाऊ टाकसाळे.

  2. प्र: माजी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी काय केले?
    उ: त्यांनी आठवडाभरापूर्वी राजीनामा दिला.

  3. प्र: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षासमोर मुख्य अडचण कोणती आहे?
    उ: भाजपच्या महायुतीत जागावाटप आणि स्थानिक गटबाजी ही मोठी अडचण आहे.

  4. प्र: नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार आहेत?
    उ: सध्या एकही आमदार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com