Raju Shetti : जयसिंगपूरची ऊस परिषद ही शेतकऱ्यांची पंढरी; ती कोणीही चुकवू नये : राजू शेट्टींचे आवाहन

Sugarcane Rate Conference : राजू शेट्टी यांनी ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले असून, जयसिंगपूरची ऊस परिषद शेतकऱ्यांची पंढरी असल्याचे सांगून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on
  1. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊसदराच्या मुद्यावरून पुन्हा एकदा संघर्षाचा इशारा दिला.

  2. सातारा जिल्ह्यातून अपेक्षित साथ न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, तर जयसिंगपूरची ऊस परिषद “शेतकऱ्यांची पंढरी” असल्याचे सांगितले.

  3. शेतकऱ्यांना योग्य दर न दिल्यास कारखानदारांना “जशास तसे उत्तर” देण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.

Satara, 09 October : ऊसदराच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी सातत्याने लढत आहे. मात्र सातारा जिल्ह्याची अपेक्षित साथ मिळत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. जयसिंगपूरची ऊस परिषद ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंढरी आहे, त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी ती चुकवू नये, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक आज (ता. ०९ ऑक्टोबर) सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी आपल्या मनातील खंतही बोलून दाखवली.

शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने झटत आहे. पण सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षित साथ मिळत नाही. आता तरुण शेतकरी शेतीत उतरल्याने अन्याय सहन करणार नाहीत. यंदा ऊसदर (Sugarcane Rate) ठरवण्यासाठी संघर्ष अटळ आहे. वारकरी जशी पंढरपूरची वारी चुकवत नाहीख त्यामुळे जयसिंगपूरची ऊस परिषदही शेतकऱ्यांची चुकवू नये.

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस परिषद यशस्वी होण्यासाठी नियोजन ठरविले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने झटत असली, तरी अपेक्षित साथ जिल्ह्यातून मिळत नाही. मे महिन्यापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पाटण, जावली, वाई, सातारा, कोरेगाव, कराड तालुक्यांमध्ये मशागत आणि पेरणी कोलमडली.

Raju Shetti
Ghaywal-Sawant Conection : नीलेश घायवाळला पाठबळ देणारे तानाजी सावंत नाहीत; तर सावंत कुटुंबातील कोण?, चर्चेला उधाण

माण, खटाव, फलटण भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला. दुबार पेरणी, खत वापरातील अडचणी आणि उत्पादन घट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे ऊस वाढीवरही परिणाम झाला असून यंदा अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकरी ऊसाला योग्य आणि उच्चांकी दर मिळावा, यासाठी सज्ज झाले आहेत.

जर कारखानदार सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करतील, तर जशास तसे उत्तर देऊ," असा इशारा बैठकीत देण्यात आला. तालुकानिहाय निरीक्षक नियुक्त करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योग्य उमेदवारांना संधी देण्यासाठी संघटना प्रयत्न करेल, असे ही त्यांनी सूचित केले.

कर्जमुक्तीसाठी आंदोलन

बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाबाबतही चर्चा झाली. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Raju Shetti
Mangalvedha NCP SP : शरद पवारांनी मंगळवेढ्यात भाकरी फिरवली; झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या शिलेदारावर टाकली जबाबदारी!

प्रश्न 1 : राजू शेट्टी यांनी काय सांगितले?
“यंदा ऊसदर ठरवण्यासाठी संघर्ष अटळ आहे; शेतकऱ्यांनी जयसिंगपूरची ऊस परिषद चुकवू नये,” असे आवाहन त्यांनी केले.

प्रश्न 2 : सातारा जिल्ह्याबद्दल काय खंत व्यक्त केली?
शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साताऱ्यातून अपेक्षित साथ मिळत नाही.

प्रश्न 3 : शेतकऱ्यांची सध्याची अडचण काय आहे?
सततच्या पावसामुळे पेरणी, खत वापर आणि उत्पादन घटले असून ऊसाचे उत्पादनही कमी होण्याची शक्यता आहे.

प्रश्न 4 : पुढील आंदोलनाचे मुद्दे कोणते?
ऊसदर, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि सत्ताधाऱ्यांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com