Shivsena News : एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; सोलापुरात काँग्रेसचा आणखी एक बडा नेता शिवसेनेच्या ताफ्यात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक माजी आमदार गळाला लावला. करमाळा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Former Karmala MLA Jaywantrao Jagtap joins Shiv Sena
Former Karmala MLA Jaywantrao Jagtap joins Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

करमाळा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक माजी आमदार गळाला लावला असून करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मंगळवारी (ता.10 जून) रात्री उशिरा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून आश्चर्याचा धक्का दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना मदत करणाऱ्या जगतापांच्या शिवसेना प्रवेशाचे कोडे मात्र अनेकांना पडले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील मुक्तागिरी या निवासस्थानी जयवंतराव जगताप यांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील , शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे , शिवसेनेचे करमाळा - माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सिंदखेड राजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर उपस्थित होते.

दरम्यान, माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. करमाळा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जयवंतराव जगताप हे करमाळा मतदार संघातून दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. ते करमाळ्यातू 1990 मध्ये अपक्ष, तर 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले होते. करमाळा विधानसभा मतदारसंघात जयवंतराव जगताप यांची विशेष अशी ताकद आहे. करमाळ्याच्या आमदार ठरवण्याची जादू माजी आमदार जगताप यांच्याकडे अजूनही आहे करमाळ्याच्या राजकारणात जगताप यांचे भूमिका महत्वपूर्ण ठरते.

Former Karmala MLA Jaywantrao Jagtap joins Shiv Sena
Shivsena Politics : 'चंद्रहारसाठी राऊतांनी शिवसेनेची वाट लावली... ठाकरेही पॉलिश गदेवर भाळले' : सांगलीतील पदाधिकाऱ्यांची खदखद बाहेर

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत संजय शिंदे यांच्या विजयात जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर बदलत्या राजकीय भूमिकेत जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला होता त्यातूनच त्यांनी विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत नारायण पाटील यांना आपल्या पाठिंबा जाहीर केला होता जयवंतराव जगताप यांच्या पाठिंबाची योगदान नारायण पाटील यांच्या आमदारकीमध्ये आहे हे नाकारून चालणार नाही.

माजी आमदार जगताप यांचे वडील स्व. नामदेवराव जगताप हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते त्यांनी करमाळ्यातून चार वेळा आमदारकी भूषवली असून एक वेळा त्यांच्या चुलते स्व.अण्णासाहेब जगताप हे करमाळ्यातून आमदार झाले होते त्यामुळे जयवंतराव जगताप यांना मोठे राजकीय पार्श्वभूमी आहे. ही ही पार्श्वभूमी काँग्रेस विचाराची असल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Former Karmala MLA Jaywantrao Jagtap joins Shiv Sena
Radhakrishna Vikhe Patil : नितेश राणेंनंतर विखे पाटलांचे विधान चर्चेत; म्हणाले, कोणताही पक्ष भाजपच्या बरोबरीला...

जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम मैत्री यांनी ही शिवसेना प्रवेश केला आहे त्यामुळे सोलापुरात एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष मजबूत करण्याच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली आहे.

धनुष्यबाणावर सर्व निवडणुका लढवणार : जगताप

शिवसेना प्रवेशाबाबत माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विकासात्मक दृष्टिकोन लक्षात घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. करमाळा तालुक्याच्या व शहराच्या विकासासाठी शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी मी उभा होतो. स्थानिक राजकारणात आमदार नारायण पाटील, मोहिते पाटील आम्ही एकत्र आहोत आणि भविष्यात देखील आम्ही एकत्रच असणार आहोत. आगामी निवडणुका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणावर लढणार आहोत, असेही माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com