Kagal Assembly Election : कागलमध्ये विधानसभेचं वारं; महायुतीतच ‘बिग फाईट’, घाटगे-मुश्रीफ लागले कामाला...

Hasan Mushrif News : पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समर्जीत घाटगे यांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला  आत्तापासूनच सुरुवात केली आहे. समाज माध्यमावर त्याची झलक आत्तापासूनच कार्यकर्त्यांना दिसू लागली आहे.
Hasan Mushrif, Samarjit Ghatge
Hasan Mushrif, Samarjit GhatgeSarkarnama

Kolhapur Political News : लोकसभेचा निकाल (Lok Sabha election Result) 4 जूनला लागल्यानंतर विधानसभेचे वारं राज्यात वाहणार आहे. अशातच राज्यात झालेले सत्ताबदल आणि मनोमिलन झालेल्या नेत्यांसमोर विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यावी, याचं महासंकट उभे राहणार आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असो व महायुतीतील (Mahayuti) इच्छुक या सर्वांना विश्वासात घेऊनच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीचा स्वप्न असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या मेहनतीवर पाणी जाऊ नये, यासाठी देखील बंडाची तयारीही ठेवली आहे.

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला कागल विधानसभा मतदारसंघही (Kagal Assembly Election) त्याच उंबरठ्यावर आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची कमतरता असताना महायुतीतील नेत्यांना मात्र हा मतदारसंघ अडचणीचा ठरणार आहे.

भविष्यात महायुती स्वतंत्र लढेल की एकत्र लढेल हे सांगणे आत्ताच कठीण असले तरी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजपचे नेते समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. समाज माध्यमांवर त्याची झलक आत्तापासूनच कार्यकर्त्यांना दिसू लागली आहे. (Latest Political News)

Hasan Mushrif, Samarjit Ghatge
Hatkanangale Lok Sabha Constituency : नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्याला धू धू धुतले; माजी शहराध्यक्षाच्या फायटिंगची शहरभर चर्चा

सध्या महायुतीत असणारे राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे (BJP) नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी लोकसभेला एकत्र येत खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात भाग घेतला. मागील पाच ते सहा वर्षांचा कालावधी पाहता पालकमंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात राजकीय वैर चांगलेच उफाळून आले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीला समझोता एक्सप्रेस धावल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असून समाज माध्यमावर त्याची झलक सध्या कार्यकर्त्यांसह अनेक मतदारांना बघायला मिळत आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यानंतर समरजीत घाटगे काही काळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. मात्र ही नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. त्याचवेळी घाटगे यांनी माझे राजकारणातील गुरु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. मुश्रीफ यांचा पराभव करूनच विधानसभा जिंकेल, अशी गर्जना त्यांनी केली होती. सध्या लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेचे वारे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात वाहणार आहे. त्यानिमित्ताने घाटगे आणि मुश्रीफ यांच्या समाज माध्यमातील चित्रफीत आगामी विधानसभा निवडणुकीची चुरस दाखवून देत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ आपल्या समाज माध्यमांच्या अकाउंटवर ऍक्टिव्ह झाले आहेत. कागलचा श्रावण बाळ म्हणून ओळख असणाऱ्या मुश्रीफ यांनी आरोग्य क्षेत्रात गोरगरिबांना मदत करण्याची भूमिका सातत्याने ठेवली आहे. जनता दरबारच्या निमित्ताने त्यांचा गावोगावी असलेला संपर्क महत्त्वाचा मानला जातो. रुग्णांना मदत करणे हाच सेवाधाम मानून त्यांचे कार्य अविरतपणे सुरू असल्याची माहिती देणारी चित्रफीत त्यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रावर पोस्ट केली होती. सध्या त्याची चर्चा जोरात सुरू आहे.

दुसरीकडे समरजीत घाटगे यांनी मतदारांना प्रत्यक्षात भेटणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, आरोग्य विषयात  कार्यकर्त्यांसह मतदारांना मदत करणे असे कार्य सुरू ठेवले आहे. त्यातूनच मागील काही दिवसात 100 वर्षे आजीचा केलेला वाढदिवस, कार्यकर्त्यांच्या कुटुंबांची रुग्णालयात जाऊन चौकशी करणे हाच धागा पकडत त्यांनी सर्वसामान्यांची नाळ धरून ठेवली आहे. त्या संदर्भातील काही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

सध्या या मतदारसंघात  महाविकास आघाडीकडे प्रबळ उमेदवार नसला तरी महायुतीतील हे दोघे प्रबळ उमेदवार यांच्यातच ईर्षा सुरू झाली आहे. लोकसभेचे गणित सुटलं नाही तोवर विधानसभेची आकडेमोड या मतदारसंघात सुरू झाल्याने पुढील काळात राजकीय गणितं सोडवताना वरिष्ठांना नाकीनऊ येणार, हे नक्की.

(Edited By – Rajanand More)

Hasan Mushrif, Samarjit Ghatge
Satara Lok Sabha News : निकालापूर्वीच झळकला शशिकांत शिंदेंच्या विजयाचा बॅनर; खंडाळ्यातील कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com