Kagal bajar samiti : राजकीय गणिते काय असू शकतात, मंत्री मुश्रीफच ठरणार केंद्रबिंदू

Hasan Mushrif : राज्यातील 21 तालुक्यांमध्ये 65 बाजार समिती नव्याने उभारणार असल्याने यामध्ये कागल तालुक्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
samarjit ghatge hasan mushrif  And Kagal bajar samiti
samarjit ghatge hasan mushrif And Kagal bajar samitisarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर कागल तालुक्यातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्यातच आता राज्यातील 21 तालुक्यांमध्ये 65 बाजार समिती नव्याने निर्माण होत असल्याने राजकारणाला नवे आयाम मिळणार आहे. यामध्ये कागल तालुक्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. तर तालुक्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, भाजपचे नेते माजी खासदार संजय घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समर्जित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना मात्र राजकीय आडोसा आणि खुर्ची मिळणार आहे.

सध्या बाजार समितीला राजकीय जुळवा जुळवा पाहता समरजीत घाटगे यांना बाजूलाच ठेवून बाजार समितीतील नवे संचालक मंडळ उदयास येऊ शकते. सध्या कोल्हापूर बाजार समितीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील नव्याने होणाऱ्या बाजार समितीवर देखील मुश्रीफ यांचाच वरचष्मा होऊ शकतो.

कागल तालुक्याला स्वतंत्र बाजार समिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. राज्यातील राजकारणाचा विचार करता सध्या कागल तालुक्यातील चार गटापैकी तीन गट राज्यातील सत्तारूढ गटाच्या बाजूला आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय घाटगे व शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक हे सर्वजण एका बाजूला आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजीतसिंह घाटगे हे दुसऱ्या बाजूला आहेत.

samarjit ghatge hasan mushrif  And Kagal bajar samiti
Hasan Mushrif : उद्धव ठाकरेंचा गौरव महायुतीमधील राष्ट्रवादी करणार; मंत्री मुश्रीफांनी सांगितलं नेमकं कारण

कागल तालुका बाजार समितीमध्ये संचालक विभागणी सामोपचाराने होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून हे तिन्ही गट एकत्र राहण्याची सध्यातरी शक्यता आहे. कागल तालुका बाजार समितीमध्ये नव्याने स्थापन होणाऱ्या संचालक मंडळामध्ये हे तिन्ही गट सहमतीने चर्चा करून निर्णय घेऊन संचालक मंडळ स्थापन करण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समर्जित घाटगे यांना मात्र या तिघांच्या विरोधात बाजार समितीत लढावे लागण्याची स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com