MLA Atul Bhosale : नऊ किलोमीटरची चढाई अन् तीन हजारांहून अधिक पायर्‍या चढत साताऱ्याच्या आमदारानं घेतलं तिरुपती दर्शन

Tirupati Balaji Mandir : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून अनेक ठिकाणी काटेंकी टक्कर पहायला मिळाली होती. अशीच चुरस कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपचे डॉक्टर अतुल भोसले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात पाहायला मिळाली होती.
Atul Bhosale
Atul Bhosale sarkarnama
Published on
Updated on

Karad News : राज्यात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांचा देखील समावेश असून ते तिसऱ्या प्रयत्नात आमदार झाले. त्यांनी येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला.

आता राज्यात महायुतीची सत्ता आली असून अनेक आमदार आपला नवस फेडण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच कराडचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या बालाजीला दर्शनाची सध्या जिल्ह्याच चर्चा सुरू आहे.

तिरुपती बालाजीवर आपली नितांत श्रद्धा असून बालाजीचे दर्शन घेण्याचे मनात होते. त्याप्रमाणे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले आहे. तर यासाठी त्यांनी नऊ किलोमीटर खडी चढाई आणि 3 हजारांहून अधिक पायर्‍या चढल्या आहेत. सध्या याची साताऱ्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

तिरुपती बालाजीवर माझी नितांत श्रद्धा असून पायी चालून देवाचे दर्शन घेण्याचा अनुभव काय असतो, हे प्रत्यक्षात अनुभवल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. यावेळी फक्त तिरूपतीचे दर्शनच घेतले नाही तर प्रवासादरम्यान विविध मंदिरांना भेटी दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Atul Bhosale
Atul Bhosale: तुम्हाला झोपडपट्टीचे पुनर्वसन जमले का?

देवाच्या दारी जायचे ठरवले होते. एक-एक पायरी चढताना ईश्वर भेटीची लागलेली ओढ नक्कीच सुखावणारी आणि आत्मिक ऊर्जा देणारी होती अशीही प्रतिक्रिया आमदार भोसले यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी गौरवी भोसले, वडील तथा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

Atul Bhosale
Atul Bhosale: कऱ्हाडमध्ये उद्योग आणता आला नाही

यानंतर आमदार भोसले यांच्यासह कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी, आई अंबाबाई चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेत माझ्या हातून सदैव लोकाभिमुख निर्णय आणि कराड दक्षिणच्या आश्वासक विकासाचे कार्य अविरत घडो, अशी प्रार्थना केल्याचेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com