Kolhapur Assembly Election : करवीरमध्ये जनसुराज्यची एन्ट्री, काँग्रेस वनवे तर महायुतीमध्ये रेस

MVA Vs Mahayuti Politics News : महायुतीमध्ये दोन तगड्या उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. युतीत उमेदवारीवरून रेस निर्माण झाल्याने शिवसेना शिंदे गटबाजी मारणार की करवीरमध्ये नुकतीच एन्ट्री केलेला जनसुराज्य शक्ती जागा मिळवणार? हे पाहणे उत्सुकतेचा विषय बनला आहे.
Rahul Patil, Chandradip Narke, Sanataji Ghorpde
Rahul Patil, Chandradip Narke, Sanataji GhorpdeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : करवीर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून चित्र स्पष्ट आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू ठेवली आहे. महाविकास आघाडीकडून बऱ्यापैकी उमेदवाराचे चित्र स्पष्ट असले तरी महायुतीमध्ये दोन तगड्या उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. युतीत उमेदवारीवरून रेस निर्माण झाल्याने शिवसेना शिंदे गटबाजी मारणार की करवीरमध्ये नुकतीच एन्ट्री केलेला जनसुराज्य शक्ती जागा मिळवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदिप नरके हे शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून तर व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी घोरपडे हे जनसुराज्य शक्तीकडून उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली करत आहेत. आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांनी घोरपडे यांना संधी देत असल्याचे जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. (Kolhapur Political News)

लोकसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी केले. त्यांच्या या विजया मागे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा कारणीभूत होती. मात्र, निकालापूर्वीच पाटील यांचे निधन झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या आनंदावर पाणी फिरले. अशातच पाटील यांचा पुढचा राजकीय वारसदार पुत्र राहुल पाटील यांना जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहेत. त्यांनी गावं गाव पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गाठीभेटी दौरे सुरू करून जनसंपर्क वाढवला आहे. पाटील यांचे सुपुत्र असल्याने काँग्रेसकडून त्यांना उमेदवारीचा ग्रीन सिग्नल मिळण्याचे दाट शक्यता आहे. हे गृहीत धरूनच राहुल पाटील यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. तर काँग्रेसकडून कॅप्टन उत्तम पाटील हे देखील इच्छुक आहेत. मात्र, महायुतीला तगडा उमेदवार म्हणून राहुल पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

Rahul Patil, Chandradip Narke, Sanataji Ghorpde
Congress Politics : मुख्यमंत्रि‍पदाबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय, रमेश चेन्नीथलांनी एका वाक्यात विषय संपवला

एकीकडे काँग्रेसच्या उमेदवारीबाबत चित्र स्पष्ट असताना महायुतीमध्ये उमेदवारीवरून रेस निर्माण झाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या उमेदवारीचा मार्ग रिकामा होईल, असा नरके यांना अंदाज होता. तसा दुसरा पैलवान मैदानात नसल्याने नरके यांची वाट आणखीन सोपी होण्याची शक्यता होती. मात्र, शाहूवाडीचे आमदार जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी नुकताच मेळावा घेत करवीरमध्ये एन्ट्री केली आहे.

या मतदारसंघातून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्या उमेदवारीचे नाव घोषित करून महायुतीचे टेन्शन वाढविले आहे. या मतदारसंघावर विनय कोरे यांनी दावा केल्यानंतर ही जागा कोणाकडे जाणार हे महत्त्वाचे आहे. त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Rahul Patil, Chandradip Narke, Sanataji Ghorpde
Balasaheb Thorat News : बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितले मुख्यमंत्री कोण होणार

सध्या नरके यांनी गाव पातळीवर गाठीभेटी आणि दौरे सुरू केली आहेत. मात्र, संताजी घोरपडे हे नरके यांच्यापेक्षा कैक पटीने प्रचारात पुढे गेले आहेत. गाठीभेटी दौरे सुरूच ठेवून महिला आशा, सेविका, कॉलेज युवतींसाठी विशेष कार्यक्रमात घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला जाणार यावरच सर्व गणित महायुतीचे अवलंबून आहे.

बंडखोरीचा फटका महायुतीला बसणार

गेल्या दोन वर्षांपासून संताजी घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यास संताजी घोरपडे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. तसेच झाल्यास त्यांची बंडखोरी अटळ समजली जाते. त्यांनी बंडखोरी केल्यास त्याचा फटका महायुतीचे संभाव्य उमेदवार चंद्रदीप नरके यांना बसू शकतो.

Rahul Patil, Chandradip Narke, Sanataji Ghorpde
Gondiya Assembly Election : गोंदिया जिल्ह्यात विधानसभेसाठी चुरस; मविआ अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com