
Kolhapur News : सोन्याचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड गावात एक ऐतिहासिक राजकीय घडामोड घडत आहे. येथील लोकनियुक्त सरपंच उत्तम वरुटे यांच्याविरोधात मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर मतदान पार पडत आहे. ही बहुदा राज्यातील पहिलीच घटना असावी.
येथील लोकनियुक्त सरपंच व कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम वरुटे यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव अकरा विरुद्ध एक असा मंजूर झाला आहे. त्यावर आता ग्रामसभेत गुप्त मतदान होत आहे. कसबा बीड गावचे एकूण मतदान 3218 आहे. यापैकी 1834 जणांनी मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
येथील ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये झाली आहे. या निवडणुकीत माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी आणि 'गोकुळ' चे माजी संचालक सत्यजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने 10 जागा जिंकल्या होत्या. पण, थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळवता आला नव्हता. उत्तम वरुटे, पांडुरंग विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष अमित वरुटे, शैलेश वरुटे, पंडित वरुटे यांच्या आघाडीचा एक सदस्य व सरपंचपदी स्वत: उत्तम वरुटे निवडून आले होते.
पण, विश्वासात न घेता निर्णय घेणे, मनमानी कारभार करणे, अशी कारणे पुढे करून सरपंचावर अविश्वास ठराव दाखल केला होता. यावर मतदान घेऊन 11 विरुद्ध 1 असे मतदान होऊन अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर आता या अविश्वास ठरावावर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावली आहे.
यात गुप्त मतदानाद्वारे अविश्वास प्रस्तावाला गावकऱ्यांची मंजुरी आहे की नाही? यावर निर्णय होणार आहे. कसबा बीड गावचे एकूण मतदान 3218 आहे. यापैकी 1834 जणांनी मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत या अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. नंतर त्याचा निकाल होणार आहे. या मतदानाची सध्या पंचक्रोशीत जोरात चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.