Satara : खरिपाचे कोट्यवधींचे नुकसान; ओला दुष्‍काळ जाहीर करा... शशिकांत शिंदे

सद्य:स्थितीत राज्य व केंद्र सरकारने State and Central Government तत्काळ शेतकऱ्यांना Farmer मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करावी, अशी मागणी आमदार शिंदे Shashikant Shinde यांनी केली आहे.
Shashikant Shinde
Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

पळशी : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने सातारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा नजर अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे, असे नमूद करून आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन दिवसांतील मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या खरीप पिकांची मोठी हानी झाली आहे. सोयाबीन, बाजरी, घेवडा तसेच कडधान्य पिकांची नासाडी झाली आहे.

परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवाळीचा सण तोंडावर आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होत राहतील; परंतु सद्य:स्थितीत राज्य व केंद्र सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करावी, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे. केंद्राला राज्य सरकारने मूल्यांकन अहवाल त्वरित सादर करावा.

Shashikant Shinde
Koregaon : आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवाचा वचपा काढणार...रामराजे

आमदार शिंदे म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. राज्य सरकारकडून सादर केल्या जाणाऱ्या नुकसानीच्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकार रब्बी हंगामातील पिकांच्या हमी भावाची घोषणा करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्याने मूल्यांकन अहवाल केंद्राला सादर करावा.

Shashikant Shinde
Satara : विरोधकांकडून केवळ पैशाचे राजकारण... आमदार शशिकांत शिंदे

‘महाविकास’प्रमाणे मदत द्यावी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यात आली होती. अगदी तशाच पद्धतीची मदत दिवाळी सणाच्या आधी सरकारने शेतकऱ्यांना केल्यास शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Shashikant Shinde
NCP : गुन्हेगारांच्या टोळ्यासारखे पक्ष चालविणाऱ्यांकडून लोकहिताची भाषा... रामराजे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com