Satara : विरोधकांकडून केवळ पैशाचे राजकारण... आमदार शशिकांत शिंदे

राजकारणातील In Politics आदर्श शरद पवार Sharad Pawar, आर.आर.पाटील R.R. Patil हे असून त्यांच्यासारखे समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे.
NCP MLC Shashikant Shinde
NCP MLC Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

सातारा : गेल्या अडीच वर्षात विरोधकांनी फक्त पैशाचे राजकारण केले आहे. आज जिल्हाला तोडण्याचे काम सुरू असून युवकांनी जिल्ह्यात पुन्हा स्वाभिमान उभा करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची स्वाभिमानी क्रांती घडवून आणावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

शशिकांत शिंदे म्हणाले, यश अपयश आयुष्यात प्रत्येकाला मिळत असते. राजकारणात शुन्यातून मंत्रीपदावर जाताना शरद पवारांसारखा नेता आणि लोकांचे आशिर्वाद, प्रेम मिळाले. गर्दीतील कार्यकर्ता ओळखणारे नेते या देशात फक्त पवारसाहेब आहेत. पराभवानंतर ही त्यांनी पुन्हा मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली तर राजकारणातून चांगला कार्यकर्ता संपू नये यासाठी विधान परिषदेवर घेतले हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही.

शशिकांत शिंदे म्हणाले, यश अपयश आयुष्यात प्रत्येकाला मिळत असते. राजकारणात शुन्यातून मंत्रीपदावर जाताना शरद पवारांसारखा नेता आणि लोकांचे आशिर्वाद, प्रेम मिळाले. गर्दीतील कार्यकर्ता ओळखणारे नेते या देशात फक्त पवारसाहेब आहेत. पराभवानंतर ही त्यांनी पुन्हा मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली तर राजकारणातून चांगला कार्यकर्ता संपू नये यासाठी विधान परिषदेवर घेतले हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही.

NCP MLC Shashikant Shinde
NCP : गुन्हेगारांच्या टोळ्यासारखे पक्ष चालविणाऱ्यांकडून लोकहिताची भाषा... रामराजे

राजकारणातील आदर्श शरद पवार, आर.आर.पाटील हे असून त्यांच्या सारखे समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे. मेडिकल काँलेज, जनता दरबार यासाठी काम केले त्यावेळी अजितदादा, रामराजे, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील सर्वांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवू शकलो. पराभवानंतही ही जनशक्ती पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा अभिमान असून या गावात पाझर तलाव, जलजीवन योजना, एमआयडीसी रस्ता अशी अनेक कामे केली.

NCP MLC Shashikant Shinde
Koregaon : मी इथंच संघर्ष करणार, इथंच लढणार अन्‌ त्याला झोपवणार... शशिकांत शिंदे

परंतू, गेल्या अडीच वर्षात विरोधकांनी फक्त पैशाचे राजकारण केले. आज जिल्हाला तोडण्याचे काम सुरू असून युवकांनी जिल्ह्यात पुन्हा स्वाभिमान उभा करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची स्वाभिमानी क्रांती घडवून आणावी.

शिंदे म्हणाले, आपणाला कोणीही पराभूत करीत नाही, आपल्यातील सगळे गट तट एक करा, एकजुटीने उभे रहा, सगळी जनता तुमच्या पाठीशी उभी राहील तर अपघाताने निवडून आलेला आमदार कधीच पराभूत होईल. आपली लढाई लबाड, गद्दार, हुकूमशाही अपप्रवृत्तींशी असून आमदारांचा पैशाचा गर्व खाली आणा. कधीही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याची ग्वाही आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com