मी, रस्त्यावर कारण ते म्हणतात, 'तंगडी तोड डालेंगे, घर मे घुसके मारेंगे'; पुण्यातील नेत्यांच्या दादागिरीवर सोमय्या भडकले

Kirit Somaiya on Unauthorized Loudspeakers in Pune : मुंबईतील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटवल्यानंतर आता अशी कारवाई पुण्यात व्हावी यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोहिम हाती घेतली आहे.
kirit somaiya
kirit somaiyaSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील फरासखाना हद्दीतील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात पोलिसांची भेट घेतली.

  2. सोमय्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना धमकावण्यात आलं असून काही नेते 'तंगडी तोडू' अशी भाषा वापरत आहेत.

  3. या वादामुळे पुण्यात धार्मिक आणि राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Pune News : मशिदीवरील भोंग्याचा मुद्द्यावरून आज (ता. 3) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुणे पोलिसांची भेट घेतली. या भेटीमध्ये फरासखाना पोलीस चौकीच्या हद्दीत असलेल्या मशिदींवर अनधिकृत भोंगे लावण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला. हे अनधिकृत भोंगे तातडीने उतरावेत अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आली.

याबाबत माध्यमांशी बोलताना केली किरीट सोमय्या म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने भोंगे मुक्त महाराष्ट्राचा आदेश दिला आहे. त्यानुसार मुंबई भोंगे मुक्त झाली आहे. मात्र त्या संदर्भात पुण्यात सुरुवात होण्याची आवश्यकता आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना पत्र आणि न्यायालयाचा आदेश पाठवला आहे. ज्यापद्धतीने मुंबई भोंगे मुक्त झाली त्याच पद्धतीने पुण्यातही कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

kirit somaiya
BJP Kirit Somaiya PUNE : मशिदींबाबत धक्कादायक माहिती समोर; किरीट सोमय्यांनी मागवली होती पुणे पोलिसांकडे माहिती

त्यानुसार आज पासून पुणे भोंगे मुक्त करण्यासाठीचा पाठपुरावा करण्याची सुरुवात केली आहे. फरासखाना पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये 14 मशिदी येतात त्यातील एकही मशिदीवर भोंग्या बाबतची कारवाई करण्यात आलेली नाही.

भोंग्याला कायद्याने पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर लावायचे असतील तर त्या ठिकाणी स्पीकर लावणे आवश्यक आहे. याबाबतची कारवाई मुंबई, ठाणे येथे झाली असून त्याच प्रकारची कारवाई पुण्याचे पोलिस आयुक्त पुण्यात देखील करतील असा आम्हाला विश्वास असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

पक्षाने भोंग्याबाबतची जबाबदारी माझ्यावर दिली असून त्यासाठी मी सबंध महाराष्ट्रात फिरत आहे. संभाजीनगरला गेलो असता त्या ठिकाणी 70% भोंगे उतरवण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आला आहे. आता पुण्यामध्ये देखील गती देण्याची आवश्यकता असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

मात्र मशिदीच्या नावाने काही पॉलिटिकल नेते दादागिरी करत आहेत. या प्रकरणावर बोलल्यानंतर ते म्हणतात की, 'किरीट सोमय्या की तंगडी तोड डालेंगे, उसके घर मे घुसके उसे मारेंगे' म्हणून या प्रश्नाच्या बाबतीत मला रस्त्यावर यावं लागतं असही किरीट सोमय्या म्हणाले.

kirit somaiya
Kirit Somaiya Politics: बांगलादेशी नागरिक सापडेनात, किरीट सोमय्यांचा मोर्चा आता महापालिका आयुक्तांकडे!

FAQs :

1. किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे काय मागणी केली?
त्यांनी पुण्यातील मशिदींवरील अनधिकृत भोंगे तातडीने उतरवण्याची मागणी केली आहे.

2. किरीट सोमय्या यांना कोणत्या प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या?
त्यांच्या म्हणण्यानुसार, "तंगडी तोडू", "घरात घुसून मारू" अशा भाषेत धमक्या दिल्या गेल्या.

3. या प्रकरणामुळे काय राजकीय परिणाम होऊ शकतात?
धार्मिक मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे, आणि पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com