Kolhapur Circuit Bench: कोल्हापुरात भाजपच्या नगरसेवकला दिलासा, विजय देसाई यांचे जातवैधता प्रमाणपत्र उच्च न्यायल्याकडून वैध

Kolhapur News: कोल्हापूर सर्किट बेंचने भाजपचे नगरसेवक विजयसिंह ऊर्फ रिंकू देसाई यांच्याविरोधातील जातवैधता समितीचा आदेश रद्द केला. दोन आठवड्यांत ओबीसी जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
Vijaysingh Desai
Vijaysingh DesaiSarkarnam
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: मुंबई न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच कडून प्र. 9 मधील भाजपचे नगरसेवक विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांचे जात वैधता प्रमाणपत्र हे वैध ठरवण्यात आले आहे. तसेच इतर मागास प्रवर्गातील जातवैधता समितीने अवैध ठरवलेला आदेश रद्द करून दोन आठवड्यात देसाई यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख व नीरज धोटे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

जानेवारी महिन्यात झालेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून विजयसिंह ऊर्फ रिंकू देसाई हे भाजपकडून इतर मागास प्रवर्गातून विजयी झाले होते. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नंदकुमार पिसे यांचा पराभव झाला होता. दरम्यान, देसाई यांच्या इतर मागास प्रवर्गाच्या दाखल्यावर पिसे यांनी जात वैधता समितीकडे हरकत घेतली होती. या हरकतीवरून 25 जून 2026 रोजी जात वैधता समितीने देसाई यांचा दाखला अवैध ठरवला होता.

जात वैधता समितीच्या आदेशावरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून 3 ऑगस्ट रोजी देसाई यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. त्यानंतर देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे जात वैधता समिती आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाला आव्हान दिले होते. ऍड. आर. के महेंद्रकर यांनी त्यांची बाजू मांडली. देसाई यांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारे गेल्या तीन महिन्यापासून सर्किट बेंच येथे युक्तिवाद सुरू होता.

Vijaysingh Desai
Manoj Jarange: जरांगे आता थेट भिडणार? एकनाथ शिंदेंवर पुन्हा केले गंभीर आरोप; 500 कोटींच्या आरोपांचे पुरावे देणार

याची अंतिम सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी पार पडली. यावेळी न्यायलायकडून जात वैधता समितीने दिलेला आदेश रद्द ठरवला आहे. तर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेला नगरसेवक रद्द केलेला आदेश देखील न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. तर जात वैधता समितीला देसाई यांना इतर मागास प्रवर्गातील जात पडताळणी दाखला दोन आठवड्यात देण्याचे आदेश सर्किट बेंच कडून देण्यात आले आहेत.

Vijaysingh Desai
Dhiraj Deshmukh : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध, फूट पडलेल्या महायुतीला काँग्रेसचा पहिला धक्का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com