Kolhapur Politics : भाजपच्या स्वतंत्र लढण्याच्या हालचाली, शिंदेंच्या शिवसेनेने पोस्टर लावत थेट प्रचाराला केली सुरूवात

Kolhapur Mahayuti politics : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार त्यांचे आहेत. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविणे त्यांना अवघड नाही, तरीही त्यांनी महायुती म्हणून लढण्याकडे कल ठेवला होता. मात्र, भाजपने त्यांच्या जागांची तयारी दाखविल्यानंतर पुढील सर्वच निवडणुकांत स्वबळावर लढण्याची ताकद काय आहे, याचा अंदाज शिंदेसेनेने घेतला असल्याचे सांगण्यात येते.
 devendra fadnavis And eknath shinde
devendra fadnavis And eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 15 Nov : कोल्हापुरात भाजपकडून काही नगरपालिकांमध्ये स्वतंत्र लढण्याची तयारी केली असताना आता शिवसेना अलर्ट झाली आहे. भाजपकडून कोणता निर्णय, कोणत्या टप्प्यावर आणि कधी घेतला जाईल हे सांगता येत नसल्याने त्याची धास्ती आता शिवसेनेने घेतली आहे.

त्यामुळे शिवसेनेने देखील कोल्हापूर महानगरपालिकेसह काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. काही इच्छुकांनी जागावाटपावर अद्याप चर्चा झाले नसताना थेट पोस्टरवर शिवसेनेचे चिन्ह टाकून प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली आहे.

कालच भारतीय जनता पक्षाकडून सहा जागांवर स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला. त्याचे पडसाद आता सर्व निवडणुकांवर उमटणार आहेत. भाजपकडून ऐनवेळी अशी भूमिका घेतली जाऊ शकते, याचा अंदाज घेऊनच शिंदे गटाने पक्षात अनेक माजी नगरसेवकांचा प्रवेश करून घेतला आहे. त्यामुळे लवकरच त्यांची भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना मोठे यश मिळाले.

 devendra fadnavis And eknath shinde
Lonavala Politics : लोणावळ्यात श्रीरंग बारणेंचा डाव; केंद्रीय मंत्र्याच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला गळाला लावून नगराध्यक्षपदाची उमेदवारी

आता यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी सर्वच नेते प्रयत्नशील आहेत. महायुती म्हणून निवडणूक लढविली पाहिजे, ही सर्वांचीच भूमिक राहिली आहे, तरीही प्रत्यक्षात प्रत्येकाने स्वतःची स्वबळाची तयारी ठेवली आहे. जिल्ह्यातील सहा ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

यामध्ये आजरा नगरपंचायत, चंदगड, शिरोळ, हुपरी, कुरुंदवाड, पेठवडगाव नगरपरिषदांचा समावेश आहे. दहा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींपैकी सहा ठिकाणी भाजपने दावा केला आहे. आता उर्वरित ठिकाणी इतर पक्षांना संधी मिळू शकते. शिंदे सेनेत 'इनकमिंग' मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात त्यांचे पालकमंत्री आहेत.

 devendra fadnavis And eknath shinde
Congress Politics : बिहारमध्ये धक्का बसताच काँग्रेसचा महाराष्ट्रात मोठा निर्णय, ठाकरेंची साथ सोडली! स्वबळावर लढण्याचा नारा!

जिल्ह्यात सर्वाधिक आमदार त्यांचे आहेत. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविणे त्यांना अवघड नाही, तरीही त्यांनी महायुती म्हणून लढण्याकडे कल ठेवला होता. मात्र, भाजपने त्यांच्या जागांची तयारी दाखविल्यानंतर पुढील सर्वच निवडणुकांत स्वबळावर लढण्याची ताकद काय आहे, याचा अंदाज शिंदेसेनेने घेतला असल्याचे सांगण्यात येते.

सर्वाधिक जागा जिंकण्याची तयारी 'नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिकेत स्वबळावर लढल्यानंतर किती जागा जिंकू शकतो, याचा अंदाज आताच घेण्यात आला आहे. निवडणूक स्वबळावर लढली, तरीही विजयी उमेदवारांची मोट महायुती म्हणून बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह महापालिकेत सर्वाधिक १६ हून अधिक प्रभागात जिंकण्याची तयारी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com