Lonavala Politics : लोणावळ्यात श्रीरंग बारणेंचा डाव; केंद्रीय मंत्र्याच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला गळाला लावून नगराध्यक्षपदाची उमेदवारी

Lonavala municipal council Election : लोणावळ्यात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्यात युती झाली आहे. रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या युतीतर्फे त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
MP Srirang Barne
Shiv Sena MP shrirang Barne RPI leader Suryakant Waghmare into the party ahead of the Lonavala municipal elections, strengthening the alliance’s political strategy.Sarkarnama
Published on
Updated on

Lonavala News, 15 Nov : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय कंबर कसली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून डाव टाकले जात आहेत. अशातच आता शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट केंद्रीय मंत्र्याच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला गळाला लावून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे.

लोणावळ्यात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्यात युती झाली आहे. रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या युतीतर्फे त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत लोणावळ्यात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. लोणावळ्याचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र सोनवणे यांचे नाव जाहीर झाले आहे.

MP Srirang Barne
Eknath Khadse : एकनाथ खडसेंमुळे भाजपसमोर मोठं आव्हान, कट्टर विरोधकासोबत केली हात मिळवणी!

तर भाजपकडून माजी नगरसेवक गिरीश कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसून ते लवकरत जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सूर्यकांत वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर बारणे म्हणाले, 'अनुभवी, प्रशासनाची परिपूर्ण माहिती, सर्वसमावेशक चेहरा व सामाजिक चळवळीतील नेतृत्वाचा विचार करत शिवसेनेच्या माध्यमातून वाघमारे यांच्या नावाची घोषणा केली.

MP Srirang Barne
Navi Mumbai Election : नवी मुंबईत महापौर पदावर भाजप, शिंदेंच्या शिवसेनेची दावेदारी; मंदा म्हात्रेंचा मुलगाही मैदानात!

नगरसेवक पदासाठी सात जागांची यापूर्वीच घोषणा केली असून अजून पाच जागा लढविणार आहे.' दरम्यान, यावेळी महायुती म्हणून शिवसेनेने खरी मैत्री राखली अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी दिली. यावेळी शिवसेना आणि रिपाइंचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com