Shivsena Vs BJP : 6 फाईल तयार, 6 महिन्यात ईडी लावणार : भाजप जिल्हाध्यक्षाचा शिंदेंच्या आमदारला जाहीर दम

Shivsena Vs BJP : कोल्हापूरमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी शिवसेना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना ईडी चौकशीची धमकी दिल्याचा आरोप होत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Political clash escalates in Kolhapur as BJP leader warns Shiv Sena MLA of ED probe.
Political clash escalates in Kolhapur as BJP leader warns Shiv Sena MLA of ED probe.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : तुमच्या भ्रष्टाचाराच्या सहा फायली माझ्याकडे तयार आहेत. येणाऱ्या सहा महिन्यात ईडी जयसिंगपुरात आली तर वाईट वाटून घेऊ नका. ईडीच्या धाडी ज्यावेळी पडतील त्यावेळी इथल्या लोकांना आत जाण्याची परिस्थिती येईल, असा जाहीर दम भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी शिरोळचे शिवसेनेचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दिला आहे.

जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचासभेत ते बोलत होते. इथे आमदार यड्रावकर यांनी राजर्षी शाहू आघाडी स्थापन केली आहे. त्याविरोधात भाजप, काँग्रेसचे विविध गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित येऊन जयसिंगपूर विकास आघाडीची स्थापना केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात तत्कालीन भाजपच्या जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीचा दम दिला होता. त्यानंतरच्या काळात राजकारणात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आता हे दोघे कट्टर विरोधक एकत्र आले आहे. आता भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनीही आमदार यड्रावकर यांना ईडीचा दम दिला आहे.

Political clash escalates in Kolhapur as BJP leader warns Shiv Sena MLA of ED probe.
MVA Politics : शिवसेना आमदाराची ताकद वाढली; मतदानापूर्वीच मिळाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह मविआचा पूर्ण पाठिंबा

नाईक निंबाळकर म्हणाले, विद्यमान आमदारांनी सध्या प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते फोडायचे काम सुरू केले आहे. भाजपचेही कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा, मी पण भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे, माझा मुख्यमंत्री आहे. येणाऱ्या काळात भाजपला डिवचणाऱ्याचे उत्तर येत्या 6 महिन्यात देणार आहे. नाही दिले तर जिल्हाध्यक्ष नाव लावणार नाही.

Political clash escalates in Kolhapur as BJP leader warns Shiv Sena MLA of ED probe.
Satej Patil On Bawankule: बावनकुळे हेलिकॉप्टरमधून सातबारे फेकायचेच राहिलेत; काँग्रेसच्या सतेज पाटलांनी महायुतीची वाजवली

तुमच्या भ्रष्टाचाऱ्याच्या सहा-सहा फायली माझ्याकडे तयार आहेत. येणाऱ्या सहा महिन्यात ईडी जयसिंगपुरात आली तर वाईट वाटून घेऊ नका. ईडीच्या धाडी ज्यावेळी पडतील त्यावेळी इथल्या लोकांना आत जाण्याची परिस्थिती येईल, असा इशारा देत या दरोडेखोराला अद्दल घडवायची असेल तर तुम्हाला या निवडणुकीत पुढे यावे लागेल, असे आवाहनही नाईक निंबाळकर यांनी केले.

लोकांना फसवायचं, त्यांच्या पैशाची लूट करायची आणि स्वतःचा फोटो झळकावयाचा. लोकांना वाऱ्यावर सोडण्याची प्रवृत्ती या आमदारांची आहे. दीड-दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला आहे. जमिनी लाटायचा प्रयत्न केला, चुकीची ऑर्डर करत माया गोळा करायची. पण लक्षात ठेवा. ये नगरपालिका अब तो झाकी है, 2029 की विधानसभा बाकी है, असं म्हणत पुढील राजकारणाचे संकेत राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी दिले.

Political clash escalates in Kolhapur as BJP leader warns Shiv Sena MLA of ED probe.
Eknath Shinde Politic's : सोलापुरात भाजपला एकनाथ शिंदेंची शिवसेना देणार टशन; उपमुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला शिवसैनिकांसाठी 'बूस्टर डोस'

तुम्ही ज्या गावाचे पाटील आहात, त्या गावाचा मी इनामदार आहे. जिथल्या तिथं गाडायला मागे पुढे बघणार नाही. शांत सुरळीत निवडणुका पार पडल्या पाहिजेत. दहशतीखाली, दडपशाही खाली काम चालणार नाही. असा दम देखील नाईक निंबाळकर यांनी आमदार यड्रावकर यांना भरला आहे. यामुळे जयसिंगपुरमध्ये राज्यातील मित्र पक्ष असलेल्या भाजप विरुद्ध शिवसेनेतील वाद टोकाला गेल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com