

महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार नसल्याने नगरपरिषद निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांनी एकमताने हा निर्णय घेतला.
आता MVA शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे आमदार सुहास बाबर यांच्या पाठीशी राहणार आहे, अशी माहिती बाबासाहेब मुळीक यांनी दिली.
Sangli News : एक वर्षभराच्या आधी येथे झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आक्रमक पवित्रा घेतलेल्या महाविकास आघाडीने नगरपरिषद निवडणुकीमध्ये बचावात्मक पवित्रा घेतला आहे. आघाडीने येथे महायुतीविरोधात उमेदवार न देता आपली सगळी ताकद एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येथील राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचालींना वेग आला असून बंडखोरी रोखण्यात नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांची मनधरणी करावी लागली आहे. काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश आले असले तरीही विटा नगरपालिके दुरंगी लढत होणार आहे. येथे नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर विरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व भाजप नेते वैभव पाटील यांच्या गटात दुरंगी निवडणूक होणार आहे.
यावरून सध्या येथे जोरदार राजकीय हालचाली पाहायला मिळत असून विटा शहराला पुर्वीसारखे समृद्ध करण्यासाठी सर्वांच्या पाठबळावर येणारी विटा नगरपालिकेची निवडणूक जिंकणारच असे सूचक वक्तव्य केलं होते. त्याप्रमाणे त्यांना यात आता यश येताना दिसत आहे. नुकताच त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेनं (ठाकरे गट) पूर्ण पाठिंबा दिला आहे. यामुळे येथे शिंदेंच्या आमदाराच्या मागे महाविकास आघाडीच उभी झाल्याचे येथे चित्र पाहायला मिळत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं विटा नगरपालिकेसाठी सर्वांच्या विचाराने सक्षम उमेदवार देण्यासाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. पण राजकीय सक्षम उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीने येथे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. तर या निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा चांगलाच दबदबा होता या निवडणुकीत तो ओसरल्याचे दिसत असून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेनेनं सक्षम उमेदवार असतील, तरच निवडणूक लढवावी, असे ठरले होते. परंतु राजकीय सक्षम उमेदवार नसल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या पाठिशी राहणार असल्याची माहिती मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. मुळीक म्हणाले, "2016 च्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचे 24 पैकी 22 उमेदवार निवडून आणले होते. परंतु मधल्या काळात ही मंडळी आता काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राहिलेली नाही. आता हीच मंडळी भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगरपालिकेच्या कारभाराचे मूल्यमापन विट्यातील जनतेने केले. गेल्या पन्नास वर्षांत कधीही विटा शहराच्या बाहेरच्या उमेदवाराला शहरात आघाडी मिळाली नव्हती. परंतु विट्यातील जनतेने चार हजारापेक्षा जास्त मतांची आघाडी सुहास बाबर यांना दिली आहे. विटेकर जनतेने नगरपालिकेतील कारभाराविषयी स्पष्ट नाराजी मतपेटीत दाखवून दिली आहे. त्यामुळेच आपण यंदा निवडणूक न लढता बाबर यांना ताकद देणार असल्याचेही मुळीक यांनी म्हटले आहे.
FAQs :
1. महाविकास आघाडीने निवडणूक का लढवली नाही?
कारण सक्षम आणि जिंकण्याची शक्यता असलेला उमेदवार उपलब्ध नव्हता.
2. हा निर्णय कोणत्या पक्षांनी घेतला?
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी.
3. आता MVA कोणाला समर्थन देणार आहे?
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे आमदार सुहास बाबर.
4. हा निर्णय कोणी जाहीर केला?
राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत.
5. या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर कसा परिणाम होईल?
शिंदे गटाची ताकद वाढेल आणि MVA च्या अंतर्गत एकजूट अधोरेखित होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.