Kolhapur Politics : ना समर्थन ना विरोध, आजी-माजी आमदारांची दांडी; कोल्हापूरच्या हद्दवाढीवर दोघांची भूमिका स्पष्ट

Kolhapur Boundary Extension Protest Rajesh kshirsagar : कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने जे आमदार या आंदोलनासाठी उपस्थित राहील त्याचे समर्थन आहे, असे समजून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा इशारा दिला होता.
Kolhapur Boundary
Kolhapur BoundarySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Boundary Extension : राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून आता आजी- माजी आमदारांनी शहरवासीयांच्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीला कोलादांडा दाखवला आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती आणि कोल्हापूर शहर हद्दवाढ विरोधी कृती समितीने केलेल्या दोन विविध टप्प्यातील आंदोलनाला निमंत्रण देऊनही आजी-माजी आमदारांनी याकडे पाठ फिरवली आहे.

कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने जे आमदार या आंदोलनासाठी उपस्थित राहील त्याचे समर्थन आहे, असे समजून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा इशारा दिला होता. मात्र केवळ राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांना वगळता आजी आणि माजी आमदारांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. तर शहर हद्दवाढ विरोधी कृती समितीकडून झालेल्या आंदोलनाला केवळ आमदार चंद्रदीप नरके यांनीच उपस्थिती लावली.

Kolhapur Boundary
Pawar Vs Thackeray : विधानसभेत सगळेच खोके म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांनी डिवचले; म्हणाले, 'कधी निवडणूक...'

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर शहरा लगत असणाऱ्या 18 गावातील सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केली. हद्दवाढ च्या विरोधात आज 18 गावांनी बंद पाळून याचा तीव्र निषेध केला. तत्पूर्वी शहर हद्दवाढ कृती समितीकडून धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हद्दवाढ कृती समितीने देखील आंदोलनाचा हत्यार उपसत आंदोलनाचा पवित्रा घेतला.

आमदार चंद्रदीप नरके यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत हद्दवाढीला विरोध केला आहे. शिवाय हद्दवाढ न करता प्राधिकरण मजबूत करण्यासाठी आवश्यक तो निधी द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून नरके यांनी केली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र दिले.

तर हद्द वाढीच्या समर्थनार्थ हद्दवाढ कृती समितीकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी जो आमदार उपस्थिती लावेन त्याचे हद्दवाढीला समर्थन असेल अन्यथा त्याचा विरोध असेल असा इशारा दिल्यानंतर ही शहरातील आमदार आणि खासदारांना निमंत्रित करण्यात आले होते. त्याशिवाय माजी आमदारांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या आंदोलनाकडे साधा निरोप देखील या आजी आणि माजी आमदारांकडून पाठवण्यात आला नाही.

केवळ राजकीय इर्षपायी निर्माण झालेल्या या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याच लोकप्रतिनिधीची भूमिका सोयीस्कर दिसत नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर स्वतःची राजकीय खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सध्या तरी दिसत आहेत. आमदारांनी मारलेली दांडी आणि लावलेले उपस्थिती पाहता सत्ताधाऱ्यात मधीलच दोन आमदार आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शहराची हद्द वाढ होणार का रखडणार? हा संशोधनाचा विषय बनला आहे. आज नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीतूनच मध्यमार्ग समोर येणार आहे.

Kolhapur Boundary
Nilesh Rane : विधानसभेत ‘त्या’ मंत्र्यांच्या मदतीला धावले नीलेश राणे; आव्हाडांना सुनावत म्हणाले, ‘आव्हाडसाहेब तुम्ही राजापूरचे नाहीत...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com