Chandradeep Narake: आमदारकीचा गुलाल लागताच चंद्रदीप नरके ॲक्शन मोडवर; माजी सरपंचाला कोर्टात खेचलं!

Chandradeep Narke MLA action against former sarpanch Sachin Chowgule : निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान खोटा प्रचार करणाऱ्या विरोधात थेट अब्रू नुकसानीचाच दावा केला आहे. वडणगेच्या माजी सरपंच विरोधात त्यांनी एक कोटीचा दावा दाखल करत नोटीस बजावली आहे.
Chandradeep Narake
Chandradeep NarakeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने बाजी मारली. मतमोजणीच्या दिवशी एकतर्फी निकाल लागेल, अशी आशा लागून राहिलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांना शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी चांगलाच घाम फोडला होता. अखेर चंद्रदीप नरके हे विजयी झाले.

कमी मताधिक्याने निवडून येताच आणि आमदारकीचा गुलाल लागताच नरके हे चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान खोटा प्रचार करणाऱ्या विरोधात थेट अब्रू नुकसानीचाच दावा केला आहे. वडणगेच्या माजी सरपंच विरोधात त्यांनी एक कोटीचा दावा दाखल केला आहे. सध्या त्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Chandradeep Narake
Raju Patil : वाढलेली 65 हजार मतं शिवसेनेलाच कशी पडली? MNS माजी आमदाराने मते मोजण्यासाठी भरले 8 लाख रुपये

करवीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचार शुभारंभ हा वडणगे गावात झाला. या शुभारंभ प्रसंगी बोलताना गावचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

गावात असणाऱ्या शिवपार्वती तलावाच्या कामासंदर्भात एक कोटीचा ढपला पाडला असल्याचा आरोप केला होता. नव्याने मंजूर केलेल्या पंधरा कोटीच्या कामातही त्यांची मोठे उद्दिष्ट असल्याचा आरोप सचिन चौगुले यांनी केला होता. हा आरोप नरके यांच्यात चांगलेच जिव्हारी लागला होता.

Chandradeep Narake
Amol Mitkari: 'जयंतरावांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला..'; मिटकरींनी मारले एकाच दगडात दोन पक्षी!

आमदार नरके यांच्याकडून हा आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत थेट वकिलामार्फत माजी उपसरपंच सचिन चौगुले यांना नोटीस बजावली आहे. नुकसानीचा दावा केला असून हा आरोप चुकीचा आहे. आरोप मागे घेऊन त्यांनी दोन दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा न्यायालयात एक कोटीचा भरून नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा नोटीसमधून दिला आहे.

माजी सरपंच सचिन चौगुले यांनी आपण कोणाचेच नाव या भाषणात घेतले नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असे उत्तर दिले आहे. शिवाय नरके यांच्या नोटीसीला आपण कोर्टातच उत्तर देऊ, असेही चौगुले यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com