Kolhapur News:कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेससह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे एक हाती नेतृत्व करणाऱ्या सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला जिल्ह्यातच ब्रेक लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. मात्र आता काँग्रेस कार्यकर्त्यांसह सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनीच पाटील गटाला प्रेरणा देत बळ देण्याचे काम सुरू ठेवले आहे.
महाविकास आघाडीमध्ये झालेल्या पराभवानंतर कसबा बावडासह शहरभरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या समर्थनार्थ डिजिटल फळक झळकले आहेत. इतकेच नव्हे तर विद्यमान आमदारांच्या फलकाशेजारीच सतेज पाटलांचे पोस्टर लागल्याने कोल्हापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस कडून पाच, राष्ट्रवादी शरद पवार पक्षांकडून तीन तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीन उमेदवार देण्यात आले होते.
सतेज पाटील यांनी या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र महायुतीने सुपडा साफ केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक आहे का अशी विचारण्याची वेळ आली होती. मात्र शहरभरात सतेज पाटील यांनी पराभवाला खचून न जाता आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांकडून धीर दिला जात आहे.
कार्यकर्त्यांकडून कसबा बावडा, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ विविध ठिकाणी आणि जिल्ह्यात पाटील यांच्या समर्थनार्थ डिजिटल फलक झळकवले आहेत. बाकीच्यांनी आमची काळजी करू नये, आमचं निस्तरायला आमचे साहेब घट्ट आहेत, अशा शब्दात कोल्हापूर शहरभरात फलक झळकवले आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनाच कार्यकर्त्यांकडून प्रेरणा दिली जात आहे. सध्या या पोस्टरची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.