Kolhapur News : राजकारणात कट्टर विरोधक पण, सहकारात दोस्त!

Kolhapur Politics Satej Patil Hasan Mushrif Friendship:कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघाने ज्या पद्धतीने सकारात्मक काम केले आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सुरू असून सहकारात आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र आहोत तेच पुढे राहणार...
Satej Patil Hasan Mushrif Friendship
Satej Patil Hasan Mushrif FriendshipSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहाही जागा महायुतीने मिळवल्यानंतर कोल्हापूरचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांची दोस्ती कायम राहणार का याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. विधानसभा निवडणुकीत हे दोघेही मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात आघाडीत सक्रिय होते. मात्र निकालानंतर मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या मैत्रीतील दोस्ताना कायम राहण्याचे संकेत दिले आहेत.

सहकारातील आमची दोस्ती कायम असेल, शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण महायुतीसोबत असणार असल्याचं स्पष्ट करत दोघांच्या मैत्रीतील नाते घट्ट आहे हे दाखवून दिले आहे. सहकार टिकणे आवश्यक आहे. त्यामुळे गोकुळ आणि जिल्हा बँकेत (केडीसीसी) कोणताही बदल होणार नसल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आज येथे स्पष्ट केले.

निवडणुकीनंतर मुंबईला गेलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात येताना आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सहकारातील भूमिकेबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया दिले. सहकार टिकवण्यासाठी आम्ही एकत्रच आहोत, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी महायुतीसोबतच असणार असे स्पष्टपणे सांगितले.

Satej Patil Hasan Mushrif Friendship
Mahayuti Government Formation: मुख्यमंत्री शपथविधीची तारीख ठरली! नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार

निवडणुकीत काही परिस्थिती निर्माण झाली आणि आम्ही स्वतंत्रपणे लढलो, तरी या संस्थांमध्ये सत्ता स्थापनेवेळी महायुती म्हणूनच आम्ही एकत्र येणार आहोत,असेही मुश्रीफ म्हणाले आहेत.सहकार टिकण्यासाठी आणि वाढीसाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघाने ज्या पद्धतीने सकारात्मक काम केले आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सुरू असून सहकारात आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र आहोत तेच पुढे राहणार, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

Satej Patil Hasan Mushrif Friendship
Eknath Shinde : शहांच्या भेटीनंतर शिंदे नाराज आहेत का? फडणवीसांनी शेअर केलेल्या फोटोवर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणाले,...

सहकारात कोणत्याही स्वरूपाचा बदल होणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे धोरण आमचे राहणार आहे. सहकारी संस्थेत राजकारण येता कामा नये. हे वरिष्ठ नेत्यांना मी पटवून देऊनच काम करणार आहे असेही मुश्रीफ म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com