Kolhapur News : माजी नगरसेवकाचे कोल्हापूरच्या खड्ड्यात 'स्विमिंग'; वैतागलेल्या लोकप्रतिनिधीच अनोखं आंदोलन

Political News : सातत्याने मागणी करून ही फुलेवाडी रिंग रोडला डांबर लागल्याने माजी नगरसेवकाने थेट रस्त्यावरील खड्ड्यात उडी घेऊन पोहून उपरोधिक आंदोलन केले आहे. याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे.
Kolhapur news
Kolhapur news Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरात सुरू असलेल्या अति मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांवर अक्षरशः दाणादाण उडाली आहे. शहराबरोबर उपनगरातील रस्त्यांवर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाले आहे. तर काही रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी खडीकरण आणि डांबरीकरण करावे, अशी मागणी या भागातील माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. मात्र, सातत्याने मागणी करून ही फुलेवाडी रिंग रोडचे काम केले नसल्याने माजी नगरसेवकाने थेट रस्त्यावरील खड्ड्यात उडी घेऊन पोहून उपरोधिक आंदोलन केले. याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे.

कोल्हापूर शहरातील उपनगरात असणाऱ्या फुलेवाडी रिंग रोड गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्याचं साम्राज्य आहे. रिंग रोडवरील खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि शहर उप समितीने वारंवार महापालिकेकडे केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी रिंग रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आंधळे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, याकडेही कानाडोळा करत कोल्हापूर महानगरपालिकेने (Kolhapur Corporation) रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात दुर्लक्ष केले होते. अखेर माजी नगरसेवकाने फुलेवाडी रिंग रोडवरील खड्ड्यासंदर्भात उपरोधिक आंदोलन करत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.

माजी नगरसेवक अमोल माने यांनी, रस्त्यावरील खड्डे नव्हे तर तलाव म्हणत त्यांनी थेट खड्ड्यात उडी घेतली. रस्त्याच्या दुर्दशेमुळे, खड्डे पडून अपघात वारंवार घडत आहेत. याला कंटाळून उपनगर समितीने रिंग रोड येथील खड्ड्यात पोहून अभिनव, अनोखे आंदोलन करत कोल्हापूर महानगरपालिकेच्या भूमिकेचा निषेध केला.

Kolhapur news
Latur Rural Assembly Constituency : लातूर ग्रामीणमधील घडामोडींकडे लक्ष; पुन्हा होणार का तडजोडीचे राजकारण ?

गेली कित्येक वर्षे या रिंग रोड येथील खड्ड्यांचा विषय गाजत आहे. यापूर्वी उपनगर समितीने अनेक आंदोलने केली. खड्ड्यात झाडे लावणे, भातरोप लावणे, खड्ड्यात बसणे, रास्ता रोको करण्यात आले होते.

प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही. या रिंगरोड रस्त्यावर खड्ड्यात पडून अनेकांना जीव गमवावा लागला. यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

Kolhapur news
BJP Vs Congress : नागपुरात राजकारण पेटलं; फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, भाजप- काँग्रेसमध्ये जुंपली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com