

Kolhapur News: गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणाचा वाद आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील उमटण्याची शक्यता आहे. नगरपालिका नगरपंचायत, आणि जिल्हा परिषद निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगड मध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपचे नेते आमदार शिवाजीराव पाटील चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघातील राजकारणाबरोबर आता जिल्हा बँकेच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटत आहेत.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा धुमासण्याची शक्यता आहे. मंगळवारी(ता.११ ऑगस्ट) ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून डिसेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीचा बिगुल वाजले असून आजपासून ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी माहिती दिली. ठराव ९ सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार आहेत. साधारण १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. बँकेच्या संचालकांची पंचवार्षिक मुदत पाच जानेवारी २०२७ ला संपते.
तत्पूर्वी १५० दिवस आधी निवडणूक प्रक्रिया सुरू करावी लागते. सभासदांकडून ठराव मागण्यासाठी ३० दिवस आहेत. प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंधक यांच्याकडे ठराव दाखल करता येणार आहे. यासाठी उपनिबंधकांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केली आहे.
असे आहेत मतदार गट एक - विकास सेवा संस्था - १९६९ गट दोन - कारखाने, सूतगिरणी - ८१ गट तीन -प्राथमिक शेतीमाल प्रक्रिया संस्था - ९२२ गट चार - अर्बन बॅंका, नागरी पतसंस्था -२०८७ गट पाच - पशु, दुग्ध, मत्स्य संस्था - ४३६१ गट सहा - इतर पाणी पुरवठा, गृहनिर्माण - २१६७ गट सात - व्यक्तीगत - ६५५ एकूण - १२ हजार २४३ अपात्र संस्था अवसायनातील - ८०३ नोंदणी रद्द - ६७५ थकबाकीदार - ३९ एकूण - १५१७
जिल्हा बँक निवडणुकीत ज्या संस्थांचे सभासदत्व तीन वर्षांपूर्वीचे आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार असणार आहे. त्यामुळे पाच जानेवारी २०२४ पूर्वीच्या सभासद संस्थांना सभासदत्व दिले आहे. व्यक्तीगत गटातील मतदारांना पाच जानेवारी २०२५ म्हणजे दोन वर्षांपूर्वीचे सभासदत्व आवश्यक आहे. आजपर्यंत ६५५ व्यक्तिगत मतदार होते. सध्या केवळ दोन व्यक्तीगत आणि दोन संस्थांचे मतदार हयात आहेत. तरीही यादीत सर्वांची नावे सध्या आहेत.
दरम्यान, ज्या संस्थांचे भागभांडवल अपूर्ण आहे, त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. साधारण नऊ सप्टेंबरला ठराव दाखल झाल्यानंतर पुढील प्रत्येक टप्प्याचा अंदाज घेता, साधारण १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान केव्हाही मतदान होऊ शकते. विकास सेवा संस्था १९६९ आहेत. पैकी काही संस्था थकबाकीदार असल्या तरीही त्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे.
मात्र, त्यांचे संचालक मतदानास पात्र ठरणार नाहीत. सर्वसाधारण सभा घेऊन संचालकांव्यतिरिक्त सभासदाला ठरावधारक निवडावे लागणार आहे. प्रशासक असलेल्या संस्थेतही ठराव घेण्यासाठी सर्वसाधारण सभा घेऊन ठरावधारकाचे नाव निश्चित करावे लागणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रिझर्व बँकेच्या नव्या नियमानुसार जे संचालक दहा वर्ष आहेत. त्यांना या निवडणुकीत सहभाग घेता येणार नाही. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांच्यासह आमदार खासदार यांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या वारसदारांना संधी देणार की कार्यकर्त्यांना संधी देणार हे देखील पहावे लागणार आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. आमदार पाटील यांच्याकडून सातत्याने जिल्हा बँकेवर चौकशी लावण्याचा इशारा दिला जात आहे.
अशातच रिझर्व बँकेकडून बेकायदेशीर कर्ज पुरवठा केल्या प्रकरणी साडेतेरा लाख रुपयांचा दंड जिल्हा बँकेला ठोठावण्यात आला. त्याचबरोबर वारंवार आमदार शिवाजीराव पाटील हे बँकेची चौकशी लावणार अशा पद्धतीची वक्तव्य येत असल्याने ही निवडणूक पुन्हा एकदा माहितीमध्ये अंतर्गत धुसफूस करणारी ठरणार काय? अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.