Gokul Chairman Election : गोकुळच्या अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला; महायुतीकडून पहिल्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीची बाजी?

Gokul chairman election update : राज्य सरकारने गोकुळवर चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती केली. अशातच आता महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत दहा वाजेपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Gokul chairman election in Kolhapur sparks political tussle as NCP's Ranjitsinh Patil emerges as a potential Mahayuti candidate.
Gokul chairman election in Kolhapur sparks political tussle as NCP's Ranjitsinh Patil emerges as a potential Mahayuti candidate.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 10 Nov : गोकुळच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. शासनाकडून चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती झाल्यानंतर गोकुळमधील सत्तासमीकरणे आणि अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आता महायुतीच्या पहिल्या अध्यक्षपदासाठी कोणत्या पक्षाला संधी मिळणार आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे समविचारी आघाडीकडे बहुमत असतानाही २९ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या बैठकीला महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिल्याने आवश्यक १४ सदस्यांचा कोरम पूर्ण झाला नाही आणि बैठक तहकूब करावी लागली. त्यानंतर या प्रकरणाला न्यायालयीन वळण मिळाले.

दरम्यान, राज्य सरकारने गोकुळवर चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती केली. अशातच आता महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत दहा वाजेपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Gokul chairman election in Kolhapur sparks political tussle as NCP's Ranjitsinh Patil emerges as a potential Mahayuti candidate.
Gokul chairman election : गोकुळवर कोणाची सत्ता? आज फैसला होणार : अध्यक्ष निवडीपूर्वी वातावरण तापणार, 600 पोलिसांचा बंदोबस्त तैनात

मात्र, अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा अध्यक्षपद स्वीकारणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय या सर्व घडामोडींमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका काय असणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्यास अजित नरके यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपकडे गेल्यास डॉ. चेतन नरके आणि अंबरीश घाटगेंना संधी मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.