Kolhapur News, 09 Sep : गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज गोकुळ शिरगाव येथे संपन्न होत आहे. पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक असल्याने या सभेकडे सर्व सभासदासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी गोकुळची सभा खेळीमेळीत व्हावी यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून महायुती म्हणून विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांना आवाहन करण्यात आले. पण मंत्री मुश्रीफ हे महायुती म्हणून आवाहन करत असताना त्यांनी गोकुळ दूध संघाच्या अहवालातून महाडिक गटाच्या प्रमुख नेत्यांना डावललं आहे.
गोकुळच्या वार्षिक अहवालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, काँग्रेसने सतेज पाटील, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, के. पी. पाटील, राजेश पाटील आणि जिल्हा बँक संचालक ए. वाय. पाटील यांचे फोटो छापण्यात आले आहेत.
मंत्री मुश्रीफ हे नेहमीच महायुती म्हणून आवाहन करत असतील तर गोकुळच्या वार्षिक अहवालात महायुतीतील महाडिक गटातील प्रमुख नेत्यांचा फोटो का छापला नाही? यावरून आता कार्यकर्ते देखील आक्रमक आहेत. त्याच्या रोषाला आणि प्रश्नाला मंत्री मुश्रीफ सामोरे जाणार का? अशी प्रतिक्रिया संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरवात झाली आहे. सर्व संचालक सोबत विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांची व्यासपीठावर खुर्ची लावण्यासाठी होती. मात्र, आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याने व्यासपीठावरील खुर्ची नाकारत महाडिक सभासदांमध्ये बसल्या.
आपल्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही तोपर्यंत विरोध कायम असणार, पण महायुती म्हणून सहकार्य अशा शब्दात शौमिका महाडिक यांनि प्रतिक्रिया दिली. तर मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी देखील उपस्थिती लावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.