Hasan Mushrif : मित्रासाठी सहकारातील नियम, मुलासाठी महायुतीचे भांडवल, मंत्री हसन मुश्रीफांची भूमिका तळ्यात मळ्यात

Gokul Doodh Sangh Politics : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात सध्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरही हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील मैत्री सहकारात कायम आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 09 Sep : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात सध्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरही हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील मैत्री सहकारात कायम आहे.

तर दुसरीकडे महायुती म्हणून पुढील निवडणुकीला सामोरे जात असताना सध्या मित्र सतेज पाटील यांच्यासाठी सहकारातील नियम पुढे करत आहेत. महायुती म्हणून मुलगा गोकुळ अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या राजकीय करिअरची चिंता करत महायुतीचे भांडवल सुरू केले असल्याचा आरोप गोकुळच्या सभासदांकडून आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे धोरण जिल्ह्यातील महायुतींच्या नेत्यांची आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा झाली असल्याने मंत्री मुश्रीफ यांनी यापूर्वीच पुढील निवडणूक ही महायुती म्हणून होणार असल्याची घोषणा केली आहे.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडीच्या स्टेजवरून मंत्री मुश्रीफ यांना चिमटा काढल्यानंतर मुश्रीफांनी महाडिक यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये अशा पद्धतीचे वक्तव्य केलं. तर दुसरीकडे गेल्या चार वर्षाच्या गोकुळच्या राजकारणात आणि व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप गोकुळमधील विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी केला आहे.

आज होणारी वार्षिक सभा ही सत्ताधाऱ्यांची शेवटची वार्षिक सभा आहे. पुढील वर्षी गोकुळची निवडणूक लागणार आहे. अध्यक्षपदाचा वाद निर्माण झाल्यानंतर अध्यक्ष महायुतीचा की शाहू आघाडीचा यावरून आज ही रणकंदन सुरू आहे. एकीकडे गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ किंवा मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघावरील अध्यक्ष हा महायुतीचा आहे. असा उल्लेख कुठेच केलेला दिसत नाही.

गोकुळ दूध संघामध्ये शाहू आघाडीचा अध्यक्ष आहे अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार समोर येत आहे. तर दुसरीकडे विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी अध्यक्ष महायुतीचा असल्याने गोकुळमध्ये युतीधर्म पाहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळत नाही तोपर्यंत माझा विरोध कायम असणार हे देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गोकुळचा विषय गेल्यामुळे गोकुळच्या आजची सभा शांततेत आणि सबुरीत चालण्याचा सल्ला महाडिक यांना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची जवळीकता पाहता कोणत्याही परिस्थितीत मंत्री मुश्रीफ यांची सतेज पाटील यांची साथ न सोडण्याची मानसिकता असल्याचे महायुतीचे नेते खाजगीत सांगतात.

Hasan Mushrif
Solapur Crime : अजितदादा अन् IPS अंजना कृष्णा यांचा व्हिडिओ व्हायरल होताच कुर्डू गावचे सरपंच, ग्रामसेवक अडचणीत : गंभीर आरोप करत महिला तलाठ्याची पोलिसांत धाव

आगामी निवडणूक महायुती म्हणून लढवत असताना वाढीव संचालकांच्या मुद्द्याला महाडिक गटाचा विरोध आहे. त्यावरून मंत्री मुश्रीफ यांना सतेज पाटील यांच्याबाबत विचारताच मंत्री मुश्रीफ हे नेहमीच सहकारातील राजकारण वेगळे, पद्धतीचा स्पष्टीकरण देत राहतात. तर दुसरीकडे महायुतीचा अध्यक्ष म्हणून विरोधी गटाला सहकार्य करण्याची भूमिका पटवून सांगतात.

मंत्री मुश्रीफ यांच्या दोन परस्पर विरोधी भूमिकेमुळे महायुतीमधील महाडिक गटाचे पदाधिकाऱ्यांचा आज ही मंत्री मुश्रीफ यांच्यावर रोष आहे. महायुती म्हणून गोकुळच्या राजकारणात उतरत असताना महायुतीच्या नेत्यांना स्थान का नाही? असा सवालच या पदाधिकाऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांना त्यात झालेल्या बैठकीत महाडिक यांच्या माध्यमातून केला आहे.

Hasan Mushrif
Shivsena Politics : "सगळं ठरलंय! राऊतांमुळे 'उबाठा'चा सत्यानाश, 2 आमदार वगळता इतर सर्वजण दसऱ्यानंतर..."; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

इकडे सहकारातील नियम सांगत सतेज पाटील यांच्यासोबतची दोस्ती कायम ठेवायची. दुसरीकडे महायुती म्हणून विरोधी गटाला सोबत ठेवायचं, हीच मंत्री मुश्रीफ यांची भूमिका केव्हा बदलणार? असा सवाल देखील महाडिक गटाचे पदाधिकारी करताना दिसत आहेत.

मुलाच्या राजकीय कारकीर्दीची मंत्री मुश्रीफांना चिंता

मंत्री मुश्रीफ यांच्या चिरंजीव नवीद मुश्रीफ हे गोकुळ दूध संघावर अध्यक्ष आहेत. मागील चार वर्षांपासून गोकुळ दूध संघाची स्थापना विविध मुद्द्यांवरून, गोंधळावरून राज्यात गाजली. मात्र आपल्या मुलाच्या कारकीर्दीत गोकुळची सभा कोणत्याही परिस्थितीत वादाची होऊ नये, याची काळजी मंत्री मुश्रीफ घेताना दिसत आहेत. यासाठी विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांना महायुतीचा युतीधर्म पटवून देण्यात मंत्री मुश्रीफ किती यशस्वी झालेत, हे आज होणाऱ्या सभेवरूनच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com