Rohit Pawar News : रोहित पवारांनी आता नवं प्रकरण काढलं बाहेर; चंद्रशेखर बावनकुळेंना पुन्हा घेरलं...

Rohit Pawar Raises New Allegations : मेघा इंजिनिअरिंगने सातारा जिल्ह्यातल्या सातारा ते म्हसवड रस्त्यातलं काम करत असताना देखील अवैध उत्खनन केलं असता स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी या कंपनीला 105 कोटींचा दंड ठोठावला होता.
"Rohit Pawar criticizes Chandrashekhar Bawankule over the Megha Engineering penalty waiver issue."
"Rohit Pawar criticizes Chandrashekhar Bawankule over the Megha Engineering penalty waiver issue."Sarkarnama
Published on
Updated on

Megha Engineering Penalty Waiver Controversy : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला दंड माफ करण्यावरून दोन्ही नेते आमनेसामने उभे ठाकले आहेत. बावनकुळेंनी रोहित पवारांचे दंड माफ केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर आता पवारांनी नवं प्रकरण बाहेर काढत त्यांना घेरलं आहे.

रोहित पवारांनी सोशल मीडियातून पुन्हा एक पोस्ट केली असून सातारा येथील अवैध उत्खननाचा मुद्दा समोर आणला आहे. त्याबाबतचे तेथील तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही त्यांनी शेअर केले आहेत. त्यांनी बावनकुळेंना उद्देशून मेघा इंजिनिअरिंगकडे बोट दाखविले आहे.

रोहित पवारांनी म्हटले आहे की, विधानसभेत आपण दिलेल्या उत्तरानुसार महसूल मंत्र्यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीला केवळ दंडात बंपर डिस्काउंटच दिलेला नाही. तर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या कंपनीची जप्त केलेली वाहने, यंत्रसामुग्री तसंच डंपर सुद्धा या कंपनीला परत करण्याचे आदेश दिलेत, हे खरं आहे काय?

"Rohit Pawar criticizes Chandrashekhar Bawankule over the Megha Engineering penalty waiver issue."
IPS Anjana Krishna News : अजित पवारांसोबतच्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल होताच अंजना कृष्णा यांच्या घरी फोनवर फोन सुरू...

एकीकडे गावगाड्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्त्यांसाठी किंवा गावकऱ्यांनी गावच्या सार्वजनिक कामांसाठी थोडाफार मुरूम काढला तर कडक कारवाई करणाऱ्या महसूल विभागाकडून मेघा इंजिनिअरिंगसाठी "बंपर डिस्काउंट सोबत डंपर रिटर्न" एवढी आकर्षक ऑफर आणि एवढी मेहरबानी का?, असा सवालही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.  

एका दुसऱ्या प्रकरणात मेघा इंजिनिअरिंगने सातारा जिल्ह्यातल्या सातारा ते म्हसवड रस्त्यातलं काम करत असताना देखील अवैध उत्खनन केलं असता स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी या कंपनीला 105 कोटींचा दंड ठोठावत या कंपनीची यंत्रसामुग्री जप्त करत बँक खाते देखील सील केलं होतं. परंतु दुर्दैवाने जून 2022 मध्ये सरकार बदलताच डिसेंबर 2022 मध्ये या कंपनीचा दंड माफ करत या कंपनीची यंत्रसामुग्री परत करण्याचा आदेश झाला. हे ही खरं आहे काय?, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.

"Rohit Pawar criticizes Chandrashekhar Bawankule over the Megha Engineering penalty waiver issue."
Nepal protest news : दोन केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा, मित्रपक्षही साथ सोडणार; PM ओलींना मोठा धक्का

महसूल विभाग आणि मेघा इंजिनिअरिंगमध्ये असा कुठला बॉण्ड झाला ज्यामुळे एवढी मेहरबानी? बावनकुळे साहेब आपल्या उत्तराची वाट पाहतोय, असे आव्हान रोहित पवारांनी दिले आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. बावनकुळे यांनी पुरावे द्या, नाहीतर राजकारण सोडा, असे आव्हान पवारांना दिले होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com