Gokul Controversy : '... तर गाई म्हशी अंगावर सोडू', फडणवीसांच्या आमदाराचा मुश्रीफांच्या शिलेदाराला कडक इशारा

BJP MLA shivaji patil allegations Over Gokul : कोल्हापूर ‘गोकुळ दूध संघाच्या चौकशीच्या पार्श्वभूमिवर आमदार शिवाजी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे.
Gokul Controversy; Hasan Mushrif
Gokul Controversy; Hasan Mushrifsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. गोकुळ दूध संघाच्या सत्ताकाळाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून चौकशीमुळे नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

  2. आमदार शिवाजी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सदस्यसंख्या वाढवून सत्ता टिकवण्याचे आरोप केले.

  3. निवडणुकीपूर्वी गोकुळमध्ये सत्ता संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

kolhapur Gokul Politics : कोल्हापूर ‘गोकुळ दूध संघाचा सत्ताकाळ संपण्याची तारीख जवळ येत आहे. तसेच चौकशीमधून पुढे येणाऱ्या कारभारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच झोप उडाली आहे’, असा टोला आमदार शिवाजी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला. तसेच शेतकरी संघाचा बैल खाली बसविला, तसे धाडस ‘गोकुळ’बाबत केल्यास दूध उत्पादक गाई, म्हशी आपल्या अंगावर सोडतील’, असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकात म्हटले आहे, वास्तविक पाहता होणाऱ्या चौकशीमुळे नेते मंडळीच विचलित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भैया माने यांनी कार्यकर्त्यांना विचलित न होण्याचा सल्ला देणे स्वतःचीच समजूत काढून घेण्यासारखे आहे. माने यांना माहिती आहे की, आपल्या नेत्याची मदार ही वाढीव सभासदांवर आहे. जर हे अपात्र झाले तर नक्कीच कोंडी होणार आहे. सत्ता कायमस्वरूपी आपल्या हातात ठेवण्यासाठी एखाद्या संस्थेत गेल्यावर आवश्‍यकतेनुसार सभासद कमी करणे किंवा वाढविणे ही सवय संपूर्ण जिल्हा ओळखून आहे.

‘गोकुळ’मध्ये सभासद वाढविण्याचा तर शेतकरी संघामध्ये सभासद कमी करण्याचा घाट कुणी घातला? शेतकरी संघातील गैरव्यवहारामध्ये शिरोळ, चंदगड शाखेतील अपहार केलेले कर्मचारी पुन्हा रुजू करून घेणे, गूळ, खत, पेट्रोलपंप यातील बेकायदेशीर उधारी, संघाच्या राजारामपुरी, लक्ष्मीपुरी जागेबाबत झालेला गैरव्यवहार, अशा सर्व कारणांनी संघातील तीन ज्येष्ठ संचालकांनी स्वतःहून राजीनामे देत पापाचे धनी होण्याचे टाळले होते. हीच नीती व पद्धत वापरून आता ‘गोकुळ’वरही डोळा आहे; परंतु, दूध उत्पादक हे जाणून आहेत.

Gokul Controversy; Hasan Mushrif
Gokul Sabha Controversy: गोकुळची सभा सुरू होताच खऱ्या सभासदांनी खुर्च्या सोडल्या; नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला

निकटवर्तीयांकडून बँक ‘भू’सपाट

शेतकरी संघातील ३४ हजार व्यक्ती सभासदांपैकी २३ हजार ३०० सभासदांचा तसेच १८०० पैकी ८०० संस्था सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याचा घाट कुणी घातला होता ? हे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी विसरला नाही. आपल्या नेत्याजवळच्या निकटवर्तीय कोणती बँक ‘भू’सपाट केल्यामुळे अपात्र ठरले? त्यांनी संघाची परिस्थिती काय करून ठेवली? याची वारंवार आठवण करून द्यावी लागत आहे.

भैया मानेंचे स्वप्न हवेतच

चौकशीमुळे नेत्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे भैया माने यांचे पदवीधर मतदारसंघातून आमदार होण्याचे स्वप्नदेखील हवेतच राहील. त्यासाठी त्यांनी आपल्या नेत्यावर कौतुकाची झालर चढविण्यासाठी ‘गोकुळ’वर वक्तव्य करायला सुरुवात केली आहे, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.

दरम्यान जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) सुरू असलेल्या राजकारणावर तीन पक्षांचे नेते सोमवारी (ता. २७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास त्यांना वेळ मिळाली असून ‘गोकुळ’च्या राजकारणाबाबत राष्ट्रवादी अजित पवार गट, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते या भेटीत एकत्रित असणार आहेत.

जिल्हा दूध संघांच्या संचालकांची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. यानंतर निवडणूक लागणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. याबाबत वेगवेगळ्या तक्रारी झाल्या आहेत. उच्च न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत. संस्था अवसायनात काढण्याचे काम सुरू झाले आहे. अशा स्थितीत आमदार शिवाजी पाटील यांनीही ‘गोकुळ’चे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत.

त्यामुळे कळत न कळत भारतीय जनता पक्षाकडून ‘गोकुळ’बाबत वेगळेच राजकारण केले जात असल्याचा आरोप अदृश्‍य शक्ती म्हणून केला जात आहे. ‘भाजप’च्या स्‍वीकृत नगसेवकांनीही या वादात उडी घेतली आहे. ‘भाजप’वर एक दबावतंत्र म्हणून तीनही पक्षांचे नेते एकत्रित मिळून ‘गोकुळ’ची निवडणूक लढवू शकतात, अशी स्थिती असल्याचा सूचक इशारा या बैठकीतून दिला जाणार आहे. या बैठकीत ‘गोकुळ’संबंधित आजपर्यंत झालेल्या सर्व घडामोडी आणि त्याचे परिणाम याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर जिल्ह्यातील ‘गोकुळ’च्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

Gokul Controversy; Hasan Mushrif
Gokul Politics : 'गोकुळ'मध्ये पुन्हा महाडिकांना डावलणार? प्लॅन ठरला, संचालकांनी...

FAQs :

1. गोकुळ दूध संघात वाद का निर्माण झाला आहे?
सत्ताकाळ संपत असल्याने आणि चौकशीमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत.

2. शिवाजी पाटील यांनी कोणावर आरोप केले?
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सदस्यसंख्या वाढवून सत्ता टिकवण्याचा आरोप केला.

3. चौकशीमुळे काय परिणाम होऊ शकतो?
चौकशीमुळे काही सदस्य अपात्र ठरू शकतात, ज्याचा सत्तेवर परिणाम होईल.

4. गोकुळ दूध संघाची निवडणूक कधी आहे?
सत्ताकाळ संपत असल्याने लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे.

5. या वादाचा दूध उत्पादकांवर काय परिणाम होईल?
राजकीय संघर्षामुळे संघाच्या कामकाजावर आणि निर्णय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com