Gokul Politics : 'गोकुळ'मध्ये पुन्हा महाडिकांना डावलणार? प्लॅन ठरला, संचालकांनी...

Kolhapur Gokul Election Mahadik Group : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालकांनी मोठ बांधायला सुरुवात केली आहे. निवडणुकी बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू असून महाडिक गटाला डावल्याची चर्चा आहे.
Gokul Politics
Gokul Politics Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पॅनेल बांधणीसाठी हालचालींना वेग आला आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी काही संचालक मंडळांनी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

आमदार डॉ. विनय कोरे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बिनविरोध करण्याचा प्रस्ताव संचालकांनी ठेवला आहे. येत्या काळात आमदार सतेज पाटील यांची देखील भेट घेतली जाणार आहे. मात्र महायुती म्हणून लढत असताना या संचालक आणि अद्याप महाडिक गटाच्या कोणत्याही नेत्याची भेट घेतलेली नाही. त्यामुळे महाडिक यांना डावलून पुन्हा एकदा ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत का? अशा शंका उपस्थित होत आहेत.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालकांनी मोठ बांधायला सुरुवात केली आहे. अशातच कोल्हापूर सर्किट बेंच कडून 1200 सभासदांच्या अपात्रतेबाबत दुग्ध निबंधक प्रशासनाकडे कारवाईचा चेंडू ढकलल्यानंतर या संस्थांवर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे. आज पासून या 1200 संस्थांची पडताळणी सुरू होणार असून त्यांना नोटीसा पाठवण्यात येणार आहे.

Gokul Politics
Gokul Election : न्यायालयात मुश्रीफांनी माघार घेताच चिरंजीव नविद मुश्रीफ 'गोकुळ' बिनविरोधसाठी कोरेंना भेटले...

अशातच या संस्था वाचाव्यात यासाठी कृती समिती स्थापन करून आज त्या संदर्भात मोर्चा आहे. तर दुसरीकडे मागील निवडणुकीतील निवडून आलेल्या सत्ताधारी पॅनेल मधील संचालकांनी मोठ बांधली आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार विनय कोरे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची या दोन दिवसात भेट घेतली आहे. तूर्तास तरी या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

17 संचालक एकसाथ

त्याचबरोबर आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के पी पाटील यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसात शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार सतेज पाटील यांची भेट घेण्यात येणार आहे. महायुती मधील सर्व नेत्यांची भेट घेतली जात असताना महाडिक गटाची भेट कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अशातच मंत्री मुश्रीफ यांना संचालक मंडळ भेटले असताना मागील निवडणुकीतील निवडून आलेले 17 संचालक आम्ही एकसंघ आहोत. राहिलेले आठ जणांबाबत तुम्ही निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले. त्यामुळे गोकुळच्या या निवडणुकीत महाडिक गटाची भेट घेणार की त्यांना वगळून निवडणूक होणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Gokul Politics
Gokul Election : ‘गोकुळ’च्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? एकटे मुश्रीफ मातब्बर महाडिकांसह अबिटकर, मंडलिक, नरकेंचे टेन्शन वाढवणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com