Gokul News : गोकुळच्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी, विरोधकांना धक्का; जिल्ह्यातील 163 दूध संस्था अवसायनात

Gokul Milk Union Elections in Kolhapur : वेळेवर लेखापरीक्षण नाही, दूध संकलन नाही, निवडणुकीसाठी व्यवस्था नाही, या कारणामुळे जिल्ह्यातील 163 सहकारी दूध संस्था अवसायनात निघाल्या.
Gokul Mahasangh
Gokul MahasanghSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक आणि राजकीय कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच गोकुळ दूध संघातील सत्ताधारी आणि विरोधकांना धक्का बसला आहे. जिल्ह्यातील 163 सहकारी दूध संस्था अवसायनात निघाल्या असून त्याचा फटका गोकुळ मधील सत्ताधारी आणि विरोधकांना बसला आहे.

वेळेवर लेखापरीक्षण नाही, दूध संकलन नाही, निवडणुकीसाठी व्यवस्था नाही, या कारणामुळे जिल्ह्यातील 163 सहकारी दूध संस्था अवसायनात निघाल्या. शिवाय गाव पातळीवर राजकारणामुळे अडचणीच्या ठरलेल्या दूध संस्था बंद झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 163 दुध संस्था बंद केल्या असून सर्वात जास्त दूध संस्था या शाहूवाडी तालुक्यातील आहेत.

Gokul Mahasangh
Pahalgam Terrorist Attack : ‘नया भारत’ फक्त मिरवण्यासाठी नको, 10 वर्षांत 2 हजारांहून अधिक जणांचा गेलाय जीव!

स्थानिक राजकारण, दूध संकलन कमी, तसेच संस्था वाढून दूध संकलन विभागल्यामुळे या दूध संस्था अवसायनात काढल्या जात आहेत. गोकुळ दूध संघाची निवडणूक इर्षेची बनल्याने अनेकांनी आपली राजकीय सोय म्हणून जुन्या दूध संस्थेमध्ये दोन गट पाडत नवीन संस्था स्थापन केली. त्यामुळे काही ठिकाणी जुन्या तर काही ठिकाणी नव्या संस्थेने सहकार नियमांनुसार प्रक्रिया न केल्याने या संस्था बंद करण्यात आल्या आहेत. शाहूवाडीतील 42 संस्थांचे व्यवहार बंद असून, जिल्ह्यातील सात संस्था बंद आहेत. त्याही अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोकुळसारख्या दूध संघामुळे जिल्ह्यात दूध संस्थांचे जाळे गावागावात आहे. त्यामुळे आर्थिक सुबत्ता येत असली तरीही त्याचा परिणाम गावातील राजकरणावर होत आहे. त्यामुळे गावातील सहकारी दूध संस्थांना महत्त्व आहे. जिल्ह्यात एकूण 6184 सहकारी दूध संस्थांची नोंदणी आहे. यांपैकी अनेक संस्थांचे काम आदर्श घेण्यासारखे आहे; मात्र दहा-पंधरा वर्षांत दूध संस्थांची संख्या वाढली; मात्र त्या प्रमाणात दूध संकलन वाढले नाही.

Gokul Mahasangh
Dr. Shirish Valsangkar : दीड वर्षापूर्वी एका डॉक्टरांसंदर्भात घेतलेला निर्णय डॉ अश्विन वळसंगकरांनी आपल्याच वडिलांबाबत का घेतला नाही?
Summary

दूध संकलन करण्यासाठी संस्थांमध्ये स्पर्धा लागली. यामध्ये काही राजकीय संस्था टिकल्या. उर्वरित संस्थांचे कामकाज चालविणेही अशक्य झाले. परिणामी त्यांचे लेखापरीक्षण वेळेवर झाले नाही. यातूनच संस्था अवसायनात निघाल्या आहेत.

लेखापरीक्षणासह दूध संकलनही न झाल्यामुळे दूध संस्थांना नोटिसा दिल्या; मात्र त्यांचे कामकाज सुधारले नाही. त्यामुळे त्या अवसायनात काढल्या आहेत. सध्या ही संख्या 163 आहे. अन्य साधारण 60-70 संस्थांचे कामकाज बंद आहे. त्यामुळे त्या संस्थाही अवसायानात काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहकार (दुग्ध)चे उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी दिली.

तालुकानिहाय अवसायनात निघालेल्या संस्था :

आजरा - 1

करवीर - 18

कागल - 6

गगनबावडा - 7

गडहिंग्लज - 9

चंदगड - 11

पन्हाळा - 27

भुदरगड - 11

राधानगरी - 17

शाहूवाडी - 42

शिरोळ - 6

हातकणंगले - 7

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com