LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक केव्हाही! कोल्हापूरमध्ये 18 हजार कर्मचाऱ्यांची फौज

Kolhapur Hatkanangale LokSabha Constituencies Preparation : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर प्रशासनाने कंबर कसली...
Election Year 2024
Election Year 2024Sarkarnama
Published on
Updated on

LokSabha Election Preparation Kolhapur News :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. प्रशासनही या तयारीत मागे नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघसाठी प्रशासनाने आतापासूनच तयारीला वेग दिला आहे. प्रत्येक गोष्टीचा आणि लागणाऱ्या साहित्यांच्या गोष्टींचा आढावा घेऊन या दोन्ही मतदारसंघांत 18 हजार कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर नियोजन सुरू आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांसाठी तब्बल 18 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन करावे लागणार आहे. यासाठी शासनाच्या सर्वच पातळ्यांवर धावपळ सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर Kolhapur जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.

Election Year 2024
Kolhapur Politics : सतेज पाटलांनी सांगितला मुहूर्त, शेट्टींना सोबत घेण्यासाठी काय म्हणाले?

मतदान केंद्राधिकारी, निरीक्षकांसह इतर आदेश दिले जात आहे. दरम्यान, लोकसभेसाठी एकूण किती अधिकारी आणि कर्मचारी लागतील, यापूर्वी किती लोक होते, मतदान केंद्रे किती असावीत, अशी सर्व पातळ्यांवर चर्चा केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्‍यक असणाऱ्या अधिकारी किंवा राखीव कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता सध्या 18 हजारांहून अधिक लोकांची आवश्‍यकता आहे.

त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यांना किंवा कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणती जबाबदारी दिली जाऊ शकते, त्यांनी यापूर्वी निवडणुकीसाठी काम केले आहे का? याची चाचपणी सुरू आहे. यातून सुमारे 18 हजार अधिकारी आणि कर्मचारी लागतील, असा निष्कर्ष काढला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हा पोलिस प्रशासनाकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनदेखील अलर्ट झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सोयीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगारांच्या शोधासोबतच अनेकांना हद्दपारीच्या नोटीस देण्यात आल्यात, तर या दोन्ही मतदारसंघांतील स्थायिक असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ही त्यानिमित्ताने जिल्ह्याबाहेर आणि जिल्ह्यांतर्गत बदली करण्यात आलेली आहे.

R...

Election Year 2024
Mahayuti News : हातकणंगलेत महायुतीचे जुळता जुळेना; इचलकरंजीत आवाडे लागले तयारीला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com