Kolhapur news: भाजपचा एकमेव अजेंडा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणे; सतेज पाटलांनी थेट मुद्द्यावरच ठेवले बोट

Satej Patil statement News : शिंदे शिवसेना असो किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असो भाजपचा एकमेव अजेंडा यांना संपवणे, त्याची प्रचिती आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर इचलकरंजी महापालिकेत भाजपकडून शिवसेनेला मिळालेल्या जागेवरून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिंदे शिवसेनेला इचलकरंजीत मताधिक्य मिळून देखील ते कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाहीत. काँग्रेसने किमान कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. स्वतः शिंदे सेना असो किंवा अजित पवार राष्ट्रवादी गट असो भाजपचा एकमेव अजेंडा यांना संपवणे, त्याची प्रचिती आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

कोल्हापुरात ते बोलत होते. कृपाशंकर सिंग यांच्यावरून बोलताना, भाजपचे नेहमीच दुटप्पी भूमिका दिसून आली आहे. निवडणुकीत फायदा घेण्यासाठी एका नेत्याने एक वक्तव्य करायचे. दुसरा नेत्याने त्याचे खंडन करायचे. मीडिया स्पेस स्वतःकडे राहील. दोन्ही घटकांना फायदा करून आपल्याला निवडणुकीत याचा वापर करता येतं का हे भाजप (BJP) नेहमी पाहत. मराठा समाज आंदोलन असेल, ओबीसी आंदोलन असेल यामध्ये सरकारचा प्लॅन एकाने एका बाजूने बोलायचं दुसऱ्याने दुसऱ्या बाजूने बोलायचे. दोन्ही घटक मतदान करताना आपल्यालाच मतदान करतील याचा प्रयत्न करतात. पण मुंबईमध्ये याचा फार फरक पडणार नाही मुंबईमध्ये मराठी माणूसच महापौर होईल, असा दावा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केला.

Satej Patil
BJP Damage Control : '...तर उत्तर भारतीय महापौर असेल', कृपाशंकर सिंहांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोल, सगळे पत्ते ओपन केले!

कोल्हापूर कसे तुम्ही म्हणशीला तसा, हा माझा डेव्हलपमेंट प्लॅन आहे. जाहीरनामा तयार करण्यासाठी आम्ही मोहीम हातात घेतले आहे. कोल्हापूरकरांनी सांगा व त्यांच्या मनातील भावना काय आहेत. प्रशासकाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेवर सरकारची सत्ता आहे, या तीन वर्षात काय झाले? कोल्हापूरची धूळधाण काय झाली हे कोल्हापूरची जनता बघत आहे. आम्ही पॉझिटिव्ह अँगलने घेत आहोत. ते टीका करतायेत काही हरकत नाही. पण आम्ही पॉझिटिव्ह अँगलने पुढची पंधरा दिवस आम्ही घेऊन जाणार आहोत, असे सतेज पाटील म्हणाले.

Satej Patil
Eknath Shinde Shivsena : शिवसेनेला हादरा! उमेदवारी नाकारताच माजी नगरसेवकाने ५० वर्षांचा हिशोबच काढला; म्हणाला...

महाराष्ट्रांमध्ये फक्त 9 ठिकाणी महायुतीची (Mahayuti) युती झाली आहे. ज्या ठिकाणी प्रबळ विरोधक आहेत. त्या ठिकाणी यांना हातात हात घेतल्याशिवाय पर्याय नाही. यांचे स्वतंत्र लढण्याचे धाडस नाही. चंद्रपूर असो कोल्हापुरात असो. ज्या ठिकाणी ताकद मोठी आहे तिथे ते एकटे लढायचे धाडस करत नाहीत. आमचे उमेदवार सक्षम आहेत म्हणून आम्ही 48 उमेदवारांची नावे आदी जाहीर केली. दुसरी यादी जाहीर केली. तुमचे उमेदवार सक्षम असते आणि तुमच्या उमेदवारावर तुमचा विश्वास असता तरी आधी न जाहीर करता नवी प्रथा महायुतीमध्ये सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही हे सिद्ध झाले आहे, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.

Satej Patil
NCP Ajit Pawar : भाजप, शिवसेनेपाठोपाठ अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही बाजी मारली; 'या' महापालिकेत पहिला उमेदवार बिनविरोध

आवास्तव वीजदर मागे घेण्यासंदर्भात NERC ने सूचना दिली होती. पण राज्य सरकारने ते परत बदलले. त्यांनी दुसरी दरवाढ केली. त्यामध्ये NERC, हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय गेला त्यावेळेला हा विषय थांबला. पण पुन्हा एकदा आजपासून नागपूर, पुणे, नवी मुंबई, मुंबई असेल या ठिकाणी विभागीय आयुक्तांच्या येथे हेरिंग सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने या हेरिंगला उपस्थित राहून प्रस्तावित वीज दर वाढीला थांबवावे.आठ तारखेला पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राचे हेरिंग आहे. हेरिंगला मी स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

Satej Patil
Congress-Shivsena UBT Alliance : पुण्यातील काँग्रेस-शिवसेना अन् मनसेच्या सर्व उमेदवारांची यादी... भाजपवर किती भारी?

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या प्रश्नावरून बोलताना मुळात ह्या जाहिराती उशिरा निघाल्या आहेत, याचा फटका ज्यांचं वय बसत नाही त्यांना होत आहे. कालपासून MPSC विद्यार्थी रस्त्यावर आहेत, गेल्या आठ दहा दिवस हा प्रश्न प्रलंबित आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील विनंती केली आहे तातडीने लक्ष घालावे. चार तारखेची परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती देखील मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचा विचार करून आजच्या आज निर्णय जाहीर करावा. विद्यार्थी आज पुण्यामध्ये रस्त्यावर आहेत, पोलीस त्यांच्यावर दबाव आणत आहेत, त्यांच्या सोशल मीडियावरील मेसेज डिलीट करायला लावले आहेत. विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घेतले जात आहेत, त्यांचे चॅट डिलीट केले जात आहेत. हे म्हणजे हुकूमशाहीकडे वाटचाल. असा आरोप आमदार पाटील यांनी केला.

Satej Patil
NCP Ajit Pawar : भाजप, शिवसेनेपाठोपाठ अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही बाजी मारली; 'या' महापालिकेत पहिला उमेदवार बिनविरोध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com