Kolhapur Stadium : कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजितदादांचे नाव, आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं कोणाची कृपा

Amal Mahadik Statement : कोल्हापूरच्या विकासवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी आमदार अमल महाडिक यांनी केली असून मंत्रिमंडळाने 12.76 हेक्टर जमीन मंजूर केली आहे.
MLA Amal Mahadik speaking about Ajit Pawar’s contribution in approving 30 acres land for Kolhapur International Cricket Stadium at Vikaswadi, Karveer.
MLA Amal Mahadik speaking about Ajit Pawar’s contribution in approving 30 acres land for Kolhapur International Cricket Stadium at Vikaswadi, Karveer.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur International Cricket Stadium : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे क्रिकेटसाठी जागा मागणीसाठी गेलो त्यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राविषयी चांगले कौतुक केले होते. ज्यावेळी आम्ही क्रिकेट स्टेडियम साठी 15 एकर जागा ही आमदार अमल महाडिक यांनी अजितदादा यांच्याकडे मागितली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, कोल्हापूर नगरी ही क्रीडा पंढरी आहे. भविष्यातून या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार आहेत.

15 एकर मध्ये हे स्टेडियम होणार नाही. तुम्हाला हे स्टेडियम अद्यावत आणि अत्याधुनिक करण्यासाठी 30 एकर जागा हवी. ती जागा मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. ती जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर करून दिली अशी आठवण आमदार अमल महाडिक यांनी सभागृहात सांगितली.

हे स्टेडियम उभा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे या स्टेडियमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव द्यावे. अशी मागणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापुढे आमदार अमल महाडिक यांनी केली. याची तात्काळ दखल घेत पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसा ठराव करू आणि त्यासाठी अजितदादांचे नाव देऊ, असे आश्वासन दिले.

MLA Amal Mahadik speaking about Ajit Pawar’s contribution in approving 30 acres land for Kolhapur International Cricket Stadium at Vikaswadi, Karveer.
Kolhapur ZP Election : महाडिक, आबिटकर, आणि पाटलांचे मनसुबे मुश्रीफांनी उधळले, भाजप शिवसेनेला गाफील ठेवलं, आता अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार

कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 12.76 हेक्टर जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

MLA Amal Mahadik speaking about Ajit Pawar’s contribution in approving 30 acres land for Kolhapur International Cricket Stadium at Vikaswadi, Karveer.
Amal Mahadik : निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी घेरले; अखेर भाजप आमदाराने स्वतःची तिजोरी उघडली

मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथील गट क्रमांक 110 व 111 मधील एकूण 12.76 हेक्टर (आर) क्षेत्राचे हस्तांतरण महसूल विभागाकडून 'शालेय शिक्षण व क्रीडा विभाग' यांच्याकडे करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com