

Kolhapur News: महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत मध्ये विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या शिवसेना आणि भाजपला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोर का झटका दिला आहे. कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसोबत जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदाचं स्वप्नं पाहणाऱ्या भाजपला राष्ट्रवादीनं मागं खेचलं आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक झाल्यापासून मंत्री मुश्रीफ यांनी शांत डोक्यानं अभ्यास करून आणि ग्रामीण भागातील मतदारांचा बाज ओळखून स्वतंत्र खेळी केली. शक्य तिथे भाजपला हाताशी धरून त्यांचाच करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेला राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जण्याची शक्यता आहे.
भाजपकडून सातत्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर दावा केला जात होता. चंदगड, करवीर, हातकणंगले, या ठिकाणी भाजपने उमेदवार देत काही ठिकाणी शिवसेनेसोबत तर काही ठिकाणी राष्ट्रवादी सोबत युती केली होती. त्यामुळे सर्वाधिक जागा निवडून आणून भाजप अध्यक्ष पदावर दावा करण्याच्या तयारीत होते. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते. मात्र सुरवातीपासूनच मंत्री मुश्रीफ यांनी स्वतंत्र रीघ ओढत बाजी मारली.
आगामी काळात जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपच्याच ताब्यात राहील, असा विश्वास चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला होता. नगरपालिका निवडणुकांमधील ‘चंदगड पॅटर्न’ आता संपुष्टात आल्याचा दावा करताना, जिल्ह्यातील विरोधकांनी निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 9
राष्ट्रवादी - 20
काँग्रेस - 15
शिवसेना (ठाकरे) - 1
जनसुराज्य - 6
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4
जिल्हा परिषद तालुका निहाय जागा
आजरा एकूण जागा 2
राष्ट्रवादी काँग्रेस - 2
कागल एकूण जागा 6
भाजप- 3
राष्ट्रवादी - 3
गगनबावडा एकूण जागा 2
काँग्रेस - 2
जिल्हा परिषद तालुका निहाय जागा
आजरा एकूण जागा 2
राष्ट्रवादी काँग्रेस - 2
कागल एकूण जागा 6
भाजप- 3
राष्ट्रवादी - 3
गगनबावडा एकूण जागा 2
काँग्रेस - 2
गडहिंग्लज एकूण जागा 5
राष्ट्रवादी - 4
जनसुराज्य - 1
चंदगड एकूण जागा 4
राष्ट्रवादी - 3
भाजप - 1
भुदरगड एकूण जागा 4
शिवसेना - 3
काँग्रेस - 1
पन्हाळा एकूण जागा 6
राष्ट्रवादी - 3
जनसुराज्य - 2
शिवसेना - 1
शाहुवाडी एकूण जागा 4
जनसुराज्य - 2
ठाकरे गट - 1
राष्ट्रवादी - 1
शिरोळ एकूण जागा 7
काँग्रेस - 1
भाजप - 1
स्वाभिमानी - 1
राजर्षी शाहू यड्रावकर आघाडी - 4
हातकणंगले एकूण जागा 11
भाजप - 4
शिवसेना - 3
काँग्रेस - 3
जनसुराज्य -
राधानगरी एकूण जागा 5
काँग्रेस - 3
राष्ट्रवादी - 1
शिवसेना - 1
करवीर एकूण जागा 12
काँग्रेस - 5
शिवसेना - 1
भाजप - 3
राष्ट्रवादी - 3
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.