Ajit Pawar News : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजितदादांचे नाव देण्यास पहिला विरोध; हिंदू महासभेने पुढं केलं ‘हे’ नाव...

Kolhapur Cricket Stadium upadte : कोल्हापूर ही करवीर संस्थानची ऐतिहासिक राजधानी असून छत्रपती ताराराणी महाराणी यांनी औरंगजेबाच्या आक्रमणाच्या काळात स्वराज्याचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचे संरक्षण केले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला नाव देण्यावरून आता हिंदू संघटनांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव या स्टेडियमला द्यावं, अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केली होती. मात्र त्याला आता अखिल भारतीय हिंदू महासभेने विरोध केला आहे.

स्टेडियमला महाराणी ताराराणी यांचे नाव देण्याची मागणी महासभेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. निवेदनात म्हंटले आहे की, कोल्हापूर येथे उभारण्यात येत असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद पाऊल आहे. हा प्रकल्प सार्वजनिक निधीतून उभारला जात असल्यामुळे त्याचे नामकरण हे सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक जबाबदारी लक्षात घेऊन करण्यात यावे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 162 नुसार, राज्य शासनास राज्यातील प्रशासकीय विषयांवर कार्यकारी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नामकरण करण्याचा अधिकार राज्य शासनाच्या कार्यकारी अधिकारांतर्गत येतो. जिल्हाधिकारी हे शासनाचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी असल्यामुळे अशा प्रस्तावांचा अभ्यास करून शासनास सादर करणे ही त्यांची प्रशासकीय जबाबदारी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Ajit Pawar
Rahul Gandhi News : एकाचवेळी गेली 11 नेत्यांची खासदारकी; तोच प्रस्ताव राहुल गांधींचंही पद घालविणार?

भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A (मूलभूत कर्तव्ये) नुसार प्रत्येक नागरिकाने राष्ट्राची परंपरा, वारसा व प्रेरणादायी इतिहास जपणे व त्याचा सन्मान करणे, हे कर्तव्य आहे. सार्वजनिक वास्तूंना ऐतिहासिक व राष्ट्रप्रेरक व्यक्तिमत्त्वांची नावे देणे ही त्या कर्तव्याची पूर्तता मानली जाऊ शकते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोल्हापूर ही करवीर संस्थानची ऐतिहासिक राजधानी असून छत्रपती ताराराणी महाराणी यांनी औरंगजेबाच्या आक्रमणाच्या काळात स्वराज्याचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचे संरक्षण केले. त्यांचे शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी व प्रशासन कौशल्य हे कोल्हापूरच्या इतिहासाचे महत्त्वपूर्ण अध्याय आहेत. त्यामुळे स्टेडियमला महाराणी ताराराणी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे.

Ajit Pawar
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई सुरूच; शेकडो संस्थांना दाखविला कायद्याचा हिसका...

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्टेडियमला ज्या लोकप्रतिनिधींचे नाव दिले जात आहे, त्या नावाला आमचा विरोध नाही. त्यांचं त्यामध्ये योगदान असेल तर छोट्याशा गॅलरीला त्यांचं नाव द्यावे. पण याबाबत जिल्हा प्रशासनाने वेगळा विचार केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com