Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई सुरूच; शेकडो संस्थांना दाखविला कायद्याचा हिसका...

Disability NGOs Maharashtra : राज्यात नोंदणी रद्द करण्यात आलेल्या सर्वाधिक १०३ संस्था या छत्रपती संभाजीनगर विभागामधील आहेत.
Tukaram Mundhe
Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

NGO irregularities Maharashtra : राज्याच्या प्रशासनातील धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात प्रधान सचिव म्हणून रुजू झाल्यापासून सुरू केलेला कामांचा धडाका सुरूच आहे. बेकायदेशीर किंवा नियमबाह्य कामे करणाऱ्या संस्थांवर मागील सहा महिन्यांत त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. काही वर्षांपासून ही कारवाई केली जात असली तरी मुंढे यांच्या काळात या कारवाईला चांगलाच वेग आला आहे.

राज्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांच्या कामकाजावर दिव्यांग कल्याण विभागाचे नियंत्रण असते. आतापर्यंत विभागाने कामात अनियमितता असलेल्या सुमारे ९०० संस्थांवर थेट नोंदणी रद्दची कारवाई केली आहे. चालू वर्षामधील हा आकडा ३६३ एवढा आहे. त्यातही मुंढेंच्या कार्यकाळातील कारवाई अधिक आहे.

राज्यात नोंदणी रद्द करण्यात आलेल्या सर्वाधिक १०३ संस्था या छत्रपती संभाजीनगर विभागामधील आहेत. तसेच पुण्यातील ६०, कोकण ५२, अमरावती ५०, नाशिक आणि नागपूर विभागातील प्रत्येकी ४९ संस्थांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांची संख्या सुमारे दोन हजार एवढी आहे.

Tukaram Mundhe
Rahul Gandhi News : एकाचवेळी गेली 11 नेत्यांची खासदारकी; तोच प्रस्ताव राहुल गांधींचंही पद घालविणार?

संस्थांचे काम कसे चालते?

राज्यात दिव्यांगांसाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत. त्यामध्ये शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, पुनर्वसन आदी क्षेत्रांचा समावेश आहे. यातील अनेक संस्थांना सरकार अनुदान देते. तर काही संस्था सीएसआर अंतर्गत चालतात. काही संस्था या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही आहेत. या संस्थांना कायद्यानुसार दिव्यांग कल्याण विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. सध्या ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानुसार या संस्थांची कार्यप्रणाली निश्चित करून त्यानुसार कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या संस्था अधिक असून त्यांच्या कामकाजात अनियमितता आढळल्यास २०१२ पासून नोंदणी रद्दची कारवाई केली जात आहे. आताही नोंदणीचे निकष न पाळणाऱ्या संस्थांवर थेट नोंदणी रद्दची कठोर कारवाई केली जात आहे.

Tukaram Mundhe
Maharashtra Government : सरकारी कार्यालयात चाललाय, मग ही बातमी वाचाच; फडणवीसांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचं वाढवलं टेन्शन...

संस्थांनी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत कामकाज करणे अपेक्षित आहे. त्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. त्यानंतर कायद्यानुसार संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com