Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांचा हिंदुत्ववाद्यांवर पलटवार; ‘कोल्हापूर कुणाच्या लग्नात मिळालेलं शहर नाही; आम्ही कुठेही जाऊ शकतो’

Kolhapur MIM Office : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ओवैसींच्या कोल्हापूर दौऱ्यावरील हिंदुत्ववादी विरोधाला प्रत्युत्तर देत भारत सर्वांचा असल्याचे सांगत विरोधकांच्या वक्तव्याला फेटाळले.
Imtiaz Jalil
Imtiaz JalilSarkarnama
Published on
Updated on
  1. दौऱ्यावरील विरोधाला प्रत्युत्तर – एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी कोल्हापूर दौऱ्यावर हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधाला उत्तर देत “देश कोणाच्या बापाची जागीर नाही” असे सांगून आपल्याला कुठेही जाण्याचा अधिकार असल्याचे ठामपणे म्हटले.

  2. पूरग्रस्तांची मदत आणि सरकारवर टीका – राज्यातील पूरस्थितीवर त्यांनी मंत्र्यांच्या फोटोसेशनवर टीका केली, गुगल मॅपद्वारे पाहणी करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी केली.

  3. क्रीडा व राजकीय भाष्य – भारत-पाकिस्तान सामन्यावर पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याने खेळू नये असा जलील यांचा दावा, तसेच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर आणि क्रिकेट बोर्डावरही त्यांनी टोलाही लगावला.

Solapur, 29 September : एमआयएम पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांच्या कोल्हापूर दौऱ्यास हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे. त्याला छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘हा देश कोणाच्या बापाची जाहगिरी नाही, कोल्हापूर म्हणजे कुणाच्या लग्नामध्ये मिळालेलं शहर नाही, आम्ही कुठेही जाऊ शकतो. ज्या खासदाराला पार्लमेंट मध्ये पुरस्कार मिळतो आणि कोण लोक सांगणार इथं यायचं नाही. अशा चिल्लर माणसांना आम्ही महत्व देत नाही, असा इशारा जलील यांनी दिला आहे.

कोल्हापूर (Kolhapur) शहरातील बागल कार्यालयात आज (ता. 29 सप्टेंबर) एमआयएम पक्ष कार्यालयाचे उद्‌घाटन हेात आहे. त्याला कोल्हापूरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यासंदर्भात बोलताना इम्तियाज जलील यांनी हिंदुत्ववादी संघटनांना त्यांच्या शब्दांत उत्तर दिले आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंबाबत इम्तियाज जलिल (Imtiaz Jalil) म्हणाले, आज काय परिस्थिती आहे. केशव उपाध्येंना घाणेरडी सवय आहे. त्यांनी या ठिकाणी दोन दिवस येऊन राहावे. राजकीय पक्षांना मी हात जोडून विनंती करतो. अशा प्रकारची घाणेरडे वक्तव्य करू नका. सरकारकडून मदतीची अपेक्षा असते. तुम्ही मदत करू शकत नाही, असं सांगा. महाराष्ट्रात मोठ्या मनाचीही लोकं आहेत. अशा प्रकारची जी जबाबदारी आहे, ती लोकं पार पाडतील.

राज्यातील काही जिल्ह्यात पुराची परिस्थिती आहे. सोलापुरातील तिऱ्हे या पूरग्रस्त गावाला भेट दिली. एमआयएम पक्षाकडून पूरग्रस्त भागांना मदत केली जात आहे. सरकारकडून पूरग्रस्तांची जी अपेक्षा आहे, ती पूर्ण झालेली नाही. राज्याच्या पूरग्रस्त भागात मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन सुरू आहे, ते बंद करावेत, अशी सूचनाही जलील यांनी केली.

Imtiaz Jalil
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंच्या मित्रपक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या; ‘प्रशासनाला त्रास देऊ नका, राजकारण करू नका’

ते म्हणाले, सध्याच्या घडीला मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यांत गुगल मॅपच्या माध्यमातून पूरस्थितीची पाहणी करावी. गुगल मीटिंगमध्ये निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करता येईल ते बघावे. पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात..ही सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळावा बैठकीवर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, गुवाहाटी येथून आणलेले पैसे दिले तर महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचे प्रश्न एका मिनिटात संपवू शकतात. तिजोरीत ठेवलेले पैसे त्यांना काढायला सांगा, असे आवाहनही जलील यांनी केले आहे.

आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामन्याबद्दल जलील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आपल्याला एखादा कप मिळाला नसता तरी काही वाकडं झालं नसतं. जगात सर्वात मजबूत टीम भारताची आहे. आम्ही आतंकवादी देशाशी कसलाच संपर्क ठेवत नाही, हे आपण पाकिस्तानसोबत मॅच न खेळता दाखवून दिलं असतं.

पाकिस्तान हा मोस्ट टेरेरिस्ट देश, त्यासोबत तुम्ही केवळ एक कप पाहिजे म्हणून खेळता? ज्यांनी आमच्या कुटुंबातील लोकांना मारलं, तुम्हीच त्यांच्याशी मॅच कशासाठी खेळता? मॅच झाल्यावर म्हणता की आम्ही हँडशेक केला नाही. मग बॉलिंग करताना डोळ्यावर पट्टी लावली का? बॅटिंग करताना डोळे झाकून घेतले होते का? भारत मॅच जिंकला, याचा मला अभिमान आहे. पण, क्रिकेट बोर्ड हे मोठ्या साहेबांच्या मोठ्या मुलाच्या हातात आहे, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला.

Imtiaz Jalil
Nagpur NCP : बाबा गेले अन्‌ भाऊ आले; राष्ट्रवादी काँग्रेसला काय मिळणार अन्‌ फरक काय पडणार?
  1. प्र: कोल्हापूर दौऱ्यावर विरोध झाल्यावर जलील यांनी काय प्रतिक्रिया दिली?
    उ: देश कोणाच्या मालकीचा नाही, आम्ही कुठेही जाऊ शकतो असे त्यांनी ठणकावले.

  2. प्र: पूरग्रस्तांविषयी जलील यांची मुख्य मागणी काय आहे?
    उ: गुगल मॅप व ऑनलाइन बैठकीतून परिस्थिती तपासून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी.

  3. प्र: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत त्यांनी काय मत व्यक्त केले?
    उ: पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याने भारताने सामना खेळू नये असे मत त्यांनी मांडले.

  4. प्र: शिंदे गटावर जलील यांनी कोणता टोला लगावला?
    उ: गुवाहाटी येथून आणलेले पैसे वापरून पूरग्रस्तांची मदत करा, अशी टीका त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com