Kolhapur Politics : मेहुणे परत जायच्या तयारीत, दाजीचा शांत डोक्याने कार्यक्रम: नेमकं काय ठरलं?

Political Comeback in Kolhapur : KP Patil and AY Patil in Focus : गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत माघार घेऊन थांबलेल्या ए. वाय. पाटील यांना पुन्हा के. पी. पाटील यांनी धक्का देत महाविकास आघाडी मधून उमेदवारी मिळवली होती.
K  P Patil And A Y Patil
K P Patil And A Y PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राजकारणाने भाऊबंदकीत वैर आणलं, याची महाराष्ट्रात अनेक उदाहरणे आहेत. मेहुण्या-पाहुण्यांमधील वाद या राजकारणापायी पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मेहुणा-पाहुणेही यातून वाचले नाहीत. माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेव्हण्या-पाहुण्यांमधील वादही तितकाच टोकाचा आहे. तो या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला.

गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत माघार घेऊन थांबलेल्या ए. वाय. पाटील यांना पुन्हा के. पी. पाटील यांनी धक्का देत महाविकास आघाडी मधून उमेदवारी मिळवली. निवडणुकीपूर्वी महायुतीत असलेले केपी पाटील यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. मात्र दिलेला शब्द फिरवल्याने ए वाय पाटील यांनी थेट मेव्हण्याच्या विरोधातच निवडणूक लढवली. पण पुन्हा एकदा या दोघांचीही महायुतीतील राष्ट्रवादीत घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे.

K  P Patil And A Y Patil
Election 2025 News : दिल्लीत मोठी राजकीय घडामोड; 'आप'चा धक्कादायक निर्णय, महापालिकेतही कमळ फुलणार

राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिले. तर माजी आमदार के पी पाटील यांनी वेळ आणि काळ पाहून अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण लोकसभा निवडणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय दिशेचा वेध घेत ए वाय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतच काँग्रेसला साथ दिली. के पी पाटील हे महायुती सोबत राहिले. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची गोची निर्माण झाल्याने के पी पाटील यांनी देखील महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. 

त्यामुळे संतापलेल्या ए वाय पाटील यांनी थेट मेव्हणे माजी आमदार के पी पाटील यांच्या विरोधातच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, विधानसभा निवडणुकीत दोघेही पराभूत झाले. ए वाय पाटील यांच्या निवडणूक लढवण्याचा फायदा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना झाला. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची एकही जागा न आल्याने सत्ताहीन झालेल्या महाविकास आघाडीला आता घरघर लागली आहे.

K  P Patil And A Y Patil
BJP Politics : भाजपकडून काहीही अपेक्षा नाहीत! प्रवेश केलेल्या माजी आमदाराची पुढची तयारी सुरू...

राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढलेले माजी आमदार के पी पाटील हे पुन्हा एकदा महायुती मधील राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. तर दुसरीकडे कोणताही गाजावाजा न करता ए वाय पाटील यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

एकंदरीतच पाहता सत्तेची भूक सर्वांनाच आहे. पण त्याला काही दिवसांपासून पक्षांतर्गत सुरू असलेल्या उड्यामुळे राजकीय पटलावर बदनाम नको, यासाठी सावध पवित्रा घेत सध्या तरी स्थिती जैसे थे ठेवण्याचा प्रकार सुरू ठेवला आहे. निवडणूकीनंतर या दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट देखील घेतल्याचे सांगितले जाते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या दोघांचाही फायदा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना होणार आहे. त्यामुळे आता पासूनच दोघे संपर्कात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com