Kolhapur Lok Sabha : हातकणंगलेत तीन अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा; कोरे-आवाडे- यड्रावकरांचं काय ठरलं

Kolhapur Lok Sabha Political News: ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची, तर आवाडे यांनी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
Kolhapur Lok Sabha Political News:
Kolhapur Lok Sabha Political News:Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapunr lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने Dhairyasheel Mane यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी सध्या भाजपसोबत BJP असलेल्या नेत्यांची भूमिका अजूनही गुलदस्तात आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे Vinay Kore यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची, तर आवाडे यांनी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर Rajendra Patil यांची भेट घेऊन चर्चा केली, तर तिघांनीही दोन तास बंद खोलीत चर्चा केल्याची माहिती आहे.

दरम्यान, या मतदारसंघातून साखर कारखानदारांचा म्हणून स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यातून या तीन नेत्यांनी एकमेकांची भेट घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. संपर्काचा अभाव, विकासकामांबाबतची नाराजी यातून खासदार माने यांना उमेदवारी मिळेल का नाही ? यावरच प्रश्‍नचिन्ह होते. तत्पूर्वीच आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे Rahul Awade यांनी या मतदारसंघातून लढण्याची घोषणा करून अप्रत्यक्षरीत्या माने यांच्या उमेदवारीलाच आव्हान दिले होते. त्यानंतर राहुल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन लढण्याची तयारी दर्शवली होती; पण तोपर्यंत महायुतीकडून खासदार माने यांची उमेदवारी जाहीर झाली.

Kolhapur Lok Sabha Political News:
Madha Loksabha : धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेशाच्या तयारीत, जयंत पाटील म्हणतात संपर्क झाला नाही...

खासदार माने Dhairyasheel Mane यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतरही आवाडे असो किंवा यड्रावकर हे महायुतीच्या प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा मतदारसंघात आहे. कोरे हे सध्या भाजपसोबत असल्याने माने यांच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यासह इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर आहे. या प्रचारात आवाडे व यड्रावकर यांनी सक्रिय राहावे, यासाठी डॉ. कोरे Vinay Kore यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून डॉ. कोरे यांनी काल सायंकाळी आवाडे यांची भेट घेतली.

माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी आपण गेल्याचा दावा डॉ. कोरे यांनी केला असला, तरी त्यामागे आवाडे यांना सक्रिय करणे हा हेतू असल्याचे समजते. त्यानंतर कालच मध्यरात्री आवाडे यांनी यड्रावकर यांची त्यांच्या नरंदे येथील निवासस्थानी भेट घेतली. यड्रावकर हेही सध्या प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र आहे. या दोघांत दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली; पण चर्चेचा तपशील समजला नाही.

Edited By : Rashmi Mane

R

Kolhapur Lok Sabha Political News:
Prakash Ambedkar News : मंडलिक, तुम्ही वर्तमानाबद्दल बोलत आहात की आणखी काही?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com